हाजी अराफात शेख यांचा भाजप प्रवेश, शिवसेनेला धक्का!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018
Total Views |



 

 

मुंबई : शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी काल रात्री भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 

हाजी अराफात शेख यांची नुकतीच राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु ही निवड शिवसेनेकडून नसून भाजपकडून होती हे नंतर स्पष्ट झाले. राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या उपाध्यक्षपदी आपली वर्णी लागावी अशी मागणी शेख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. परंतु त्यांची ही इच्छा शिवसेनेकडून पूर्ण झाली नाही. भाजपकडून त्यांना राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यांनी ते स्वीकारले आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

 

यामुळे शिवसनेला मात्र मोठा धक्का बसला आहे. हाजी अराफात शेख यांच्या भाजप प्रवेशाबाबत शिवसेनेतील कोणत्याही नेत्याकडून अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. शेख हे गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना नेतृत्वावर नाराज होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. यानंतर आता शेख यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्येच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@