नक्षलवाद्यांशी संबंध अटक प्रकरण : पुणे पोलिसांना ९० दिवसाची मुदतवाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018
Total Views |





 


 

पुणे: नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या कारणावरून पाच जणांना अटक करण्यात आली होती. या 5 आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणी अटकेत असलेले सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन आणि महेश राऊत या पाच जणांना आज शिवाजी नगर कोर्टात हजर करण्यात आले होते.

 

या पाचही जणांचे २८ ऑगस्टला नव्याने अटक करण्यात आलेल्या लोकांशी संपर्क असल्याची माहिती पुणे पोलिसांसमोर आली. याची तपासणी करण्यासाठी सरकारी वकील उज्वला पवार यांनी कोर्टाकडे मुदत मागितली होती, म्हणून कोर्टाने हि ९० दिवसांची मुदतवाढ दिली.

 

सुरेंद्र गडलिंग आणि शोमा सेन यांच्या जामिनावर ६ सप्टेंबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आरोपीना सुरक्षेच्या कारणास्तव येरवडा जेलमधून हलवण्यात यावे. यासाठीही पुणे पोलिसांनी अर्ज केला होता त्याचीही सुनावणी याचदिवशी करण्यात येणार आहे. येरवडा जेलमध्ये सध्या साडेपाच हजारहून अधिक कैदी आहेत. या जेलची क्षमता मात्र २३०० एवढीच आहे.

 

नेमके काय आहे हे प्रकरण?

 

गेल्या ३१ डिसेंबरला शनिवारवाड्यामध्ये एल्गार परिषद पार पडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार उसळला होता. या परिषदेला माओवाद्यांकडून आर्थिक पुरवठा झाल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन आणि महेश राऊत यांना अटक करण्यात आली. या आरोपींच्या घरी छापे टाकण्यात आले. यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्र ताब्यात घेण्यात आली. तसेच या आरोपींच्या ईमेलची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर २८ ऑगस्टला अटक करण्यात आलेल्या वरवरा राव, अरुण परेरा, गौतम नवलाख, सुधा भारद्वाज आणि वर्नोन गोन्साल्विस हे पाच जण ढवळे, प्रा. सेन, अ‍ॅड. गडलिंग, राऊत यांच्या संपर्कात असल्याची माहिती या पडताळणीतून समोर आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@