गोरगरिबांच्या शिक्षणासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देणार : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2018
Total Views |



ठाणे : “मराठा, धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेण्याची आमची तयारी आहेच पण, आम्ही शासकीय नोकऱ्या च्या पुढे जाऊनदेखील विचार केला असून मराठा इतर समाजातील गोरगरिबांच्या मुलांना मोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणे परवडावे म्हणून उच्च शिक्षणासाठी लागणारे ५०टक्के शुल्क परत करण्याची योजना आणली आहे. ५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी श्री कुलस्वामी सारख्या सहकारी पतपेढीनेदेखील यात पुढाकार घेऊन तरुणांना त्यांचे व्यवसाय उभे करण्यास मदत करावी,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री कुलस्वामी सहकारी पतपेढीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

 

१००० कोटी रुपयांच्या व्यवसायातील उलाढालीबाबत संचालक मंडळ सभासदांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्यात १३ हजार सहकारी पतपेढ्या असून केवळ ४० पतपेढ्या एवढा मोठा व्यवसाय करू शकतात. पुढील काळात पहिल्या पतपेढ्यांत श्री कुलस्वामीचे नाव यावे,” अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समस्या सोडवणार

नॅशनल मार्केट म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठेमुळे बाजार समित्यांचे महत्त्व उद्या वाढणार आहे,” असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही देशातील नव्हे तर आशियातील अग्रगण्य आहे. या बाजार समितीच्या फळ, भाजीपाला, धान्यविषयक तसेच माथाडींच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी एका महिन्यात स्वतंत्र बैठका घेण्यात येतील.

याप्रसंगी मुंबै बँकेचे अध्यक्ष . प्रवीण दरेकर, . शरद सोनवणे, . मंदा म्हात्रे, श्री कुलस्वामीचे अध्यक्ष शंकर पिंगळे, महापौर जयवंत सुतार यांनी आपली मनोगते मांडली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@