एसीबी प्रमुखपदी संजय बर्वे यांची नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |



मुंबई : राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक व वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) प्रमुखपदी निवड झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे २०१६ पासून हे पद रिक्त असल्याने राज्य सरकारने ही निवड केली. तत्कालीन प्रमुख सतीश माथुर यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यापासून हे पद रिक्त होते.

 

मंगळवारी सांयकाळी संजय बर्वे यांच्या नियुक्तीचा अध्यादेश राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आला. मुंबई पोलिस आयुक्तपदी बर्वे यांची वर्णी लागले अशी शक्यता होती. मात्र ऐनवेळी सुबोध जयस्वाल यांच्याकडे मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा सोपविण्यात आली. तेव्हापासून संजय बर्वे बदलीच्या प्रतीक्षेत होते. तसेच राज्य सरकारच्या या निवडीने अखेर दोन वर्षांनंतर एसीबीला प्रमुख मिळाला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@