आम्ही तर जनतेचे विश्‍वस्त, महापालिकेत भाजपाची भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |
 

जळगाव महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या उमेदवार सीमा भोेळे आणि उपमहापौरपदी डॉ. अश्‍विन सोनवणे यांची निवड झाल्यानंतर सत्ताधार्‍यांची भूमिका, कामकाजाची चौकटही बदलली आहे. नूतन पदाधिकारी ‘जनतेचे विश्‍वस्त’ म्हणून काम पाहणार आहेत. गणेशोत्सवाच्या मंगल मुहूर्तावर याची दणक्यात सुरुवातही झाली आहे.
 
 
शहरविकास या एकमेव मुद्यावर भाजपाने जळगाव महापालिकेची सत्ता जिंकली. जळगावकरांनी भरभरून मते भाजपा उमेदवारांच्या पारड्यात टाकली. सर्वसामान्यांना भाजपाकडून अपेक्षा खूप आहेत तर सत्ताधारी म्हणून आपलीही जबाबदारी वाढल्याची जाणीव पदाधिकार्‍यांना आहे. यातूनच त्यांनी ‘जनतेचे विश्‍वस्त’ म्हणून भूमिका स्वीकारली आहे. प्रगल्भ लोकशाहीत हेच अभिप्रेत आहे. महापौर व उपमहापौर निवडीप्रसंगी आ. भोळे यांनी महापालिका कर्जमुक्त होईपर्यंत एकही पदाधिकारी महापालिकेचे वाहन आणि चालक यांची सेवा घेणार नसल्याचे जाहीर केले. यात सवलत कुणालाच नाही. त्यांनी सभागृहातील विरोधी पक्ष शिवसेनेलाही खुलेपणाने सहकार्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे महापालिकेचे दरमहा दीड ते दोन लाख रुपये वाचणार आहेत. हा वाचणारा पैसा अंतिमतः जळगावमधील करदात्यांचा आहे. त्याच्या योग्य विनियोगाची जबाबदारी राज्यकर्ता म्हणून भाजपाची असणार आहे.
 
 
महापालिकेच्या १७ मजली इमारतीचे पूर्वी कौतुक होते. प्रत्येक मजला प्रशस्त आहे. पण एवढ्या पसार्‍याची खरोखरच गरज आहे का? असा प्रश्‍न अनेकदा विचारला गेला आहे. तो आधीच्या सत्ताधार्‍यांनी गांभीर्याने घेतला नाही. भाजपाने विचार केला - वरचे १० मजले भाड्याने दिले तर महापालिकेला अतिरिक्त उत्पन्न मिळेल किंवा त्यांचा वापर बंद ठेवल्यास खर्चात बचत होईल. व्यापक विचार करायला जनहिताची तळमळ असावी लागते. हे कसे घडते? आपल्याला का सुचले नाही? असे प्रश्‍न यापुढे अनेकांना पडतील मात्र, भाजपाचा कारभार पाहताना विचारमंथनातून आपसूकच उत्तरेही मिळतील. भाजपाने उद्योगधंदा, नोकरी नाही म्हणून नगरसेवक होण्याची संधी कुणालाही दिलेली नाही. पक्षाला ‘जनसेवक’ अपेक्षित आहेत. पोट भरण्याचे साधन म्हणजे महापालिका नाही. सरकारकडून जळगावसाठी मिळालेले १२५ कोटी रुपये महापालिकेच्या खात्यात जमा आहेत. अजून २०० कोटी मिळवून देण्याचे आश्‍वासन ना. गिरीश महाजन यांनी दिले आहे. या ३२५ कोटींचे ‘मालक’ नव्हे तर ‘विश्‍वस्त’ भाजपाचे ५७ नगरसेवक असणार आहेत. हा मोठा विचार करायलाही मानसिकता लागते. ती भाजपा नेतृत्त्वाकडे आहे.
 
 
दुसर्‍या मजल्यावरून कारभार पाहणार
महापौरांचे कार्यालय १७ व्या मजल्यावर आहे. लिफ्ट बंद असेल तर महापौरांपर्यंत पोहोचणे जनतेसाठी कठीण होते. ज्येष्ठ व्यक्ती तर जाऊच शकत नाहीत. जनता आणि राज्यकर्त्यांमधील हा दुरावाही भाजपाने संपुष्टात आणला आहे. महापौरांचे कार्यालय दुसर्‍या मजल्यावर आणले आहे. महापौर सीमा भोळे इथेच बसून जनतेची गार्‍हाणी ऐकतील. ट्रेलर रिलीज झाला आहे, चित्रपट बाकी आहे.
@@AUTHORINFO_V1@@