'तिहेरी तलाक'विरोधी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |

  

 

नवी दिल्ली : कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिहेरी तलाक विधेयकाच्या अध्यादेशाला आज मंजुरी देण्यात आली आहे. मुस्लिम समाजातील महिलांसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाक हा बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे असा निर्णय दिला होता. तिहेरी तलाकच्या विधेयकाला लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी देण्यात आली होती. परंतु विरोधकांनी दिशाभूल केल्यामुळे राज्यसभेत या विधेयकाचे कामकाज रखडले आहे.
 

या विधेयकात काही नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत.

 

१. तिहेरी तलाक हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे.

 

२. पतीने तीन वेळा तलाक हा शब्द उच्चारून तलाक दिल्यास पत्नी किंवा तिचे नातेवाईक तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल करू शकतात.

 

३. पीडित पत्नी पतीसोबत तडजोड करण्यास तयार असेल तर न्यायाधीश आपल्या अधिकाराचा वापर करून समस्येवर तोडगा काढू शकतात. अशावेळी गुन्हा मागे घेता येऊ शकतो.

 

४. मॅजिस्ट्रेट आरोपीला जामीन मंजूर करू शकतील. या विधेयकाच्या तरतूदींनुसार, पती-पत्नीला भरपाई देण्याच्या मुद्यावर सहमत असेल तेव्हा मॅजिस्ट्रेट जामीन मंजूर करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेतील. भरपाईची रक्कम मॅजिस्ट्रेट ठरवतील. मॅजिस्ट्रेट पती-पत्नीतील वाद मिटवण्यासाठी आपले अधिकार वापरू शकतील, असेही यात म्हटलं आहे.

 
५. पीडित महिलेच्या नातेवाईकांनाही तक्रार दाखल करण्याचा हक्क असेल. तीन वर्षांच्या शिक्षेत बदल केला जाणार नाही, अशा काही तरतूदी यात निश्चित करण्यात आल्या आहेत.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@