म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |


नवी दिल्लीसेक्युरीटीज बोर्ड एक्सचेंज ऑफ इंडीयाने (सेबी) मंगळवारी म्युचल फंडांच्या खर्चिक गुणोत्तरात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे म्युच्युअल फंड कंपंन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. या निर्णयाचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.

 

म्युच्युअल फंडांमध्ये छोट्या गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग पाहता सेबीचे आणखी एक पाऊल उचलले आहे. मंगळवारी घेण्यात आलेल्या सेबीच्या बैठकीत म्युच्युअल फंडांच्या एकूण खर्चाचे गुणोत्तर २.२ टक्क्यांनी घटवून २ टक्क्यांवर केला आहे. सध्या हे गुणोत्तर २.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये हे गुणोत्तर १.२५ टक्के असणार आहे. त्याऐवजी इतर म्युच्युअल फंडांमध्ये हे गुणोत्तर १ टक्के असणार आहे. या निर्णयाचा मोठा लाभ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्‍यांना होणार आहे. म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांकडून काही प्रमाणात खर्च वसूल करतात. प्रत्येक म्युच्युअल फंडांच्या खर्चाचे गुणोत्तर ठरलेले असते. या गुणोत्तरात कपात केल्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना याचा फायदा होणार आहेया निर्णयाचे पडसात बुधवारी शेअर बाजारावर उमटले. रिलायन्स निप्पॉन , एचडीएफसी म्युच्युअल फंडांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. रिलायन्स निप्पॉनचा शेअर दिवसभरात १२ टक्क्यांनी घसरला.

 

म्युच्युअल फंड गंगाजळीत वाढ : ऑगस्टमध्ये म्युच्युअल फंडातील गंगाजळी प्रथमच २५.२० लाख कोटींवर पोहोचली आहे. ग्राहकांचा विश्वास पात्र ठरवण्यातअसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडीया (एम्फी) या निरीक्षण फंड संघटनेला यश आले आहे. त्यामुळे सेबीने उचललेले हे पाऊल छोट्या गुंतवणूकदारांच्या पथ्थ्यावर पडणार असल्याने गुंतवणूक आणखी वाढणार आहे.


 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
@@AUTHORINFO_V1@@