मनपात शिवसेनेचे नाटकएकदाचे संपवूनच टाका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |

 
 
जळगाव :
महापालिकेतील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची स्थिती ‘सत्तातुराणां न भयं न लज्जा’ अशी झाली आहे. जळगावकरांनी जोरदार दणका देवूनही सत्तेसाठी कुठेही कोलांटउड्या मारायला ही मंडळी तयार आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर जनतेतून निवडून यायचे आणि जनतेचाच विश्‍वासघात करीत पुन्हा सत्तेसाठी भाजपाशी बोलणी करायची. हे कमी की काय म्हणून भाजपाच्या नेत्यांवरच खोटे आरोप करीत महापौर निवडीवर बहिष्कार घालणार्‍या शिवसेनेला महापालिकेतूनच ‘आऊट’ करण्याची वेळ आली आहे, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
 
 
गेली कित्येक वर्षे सत्तेची फळे भोगलेले शिवसेनेचे कथित नेते आणि कार्यकर्ते सत्ता नाही म्हणून सध्या कमालीचे अस्वस्थ झाल्याचे दिसते. ७५ पैकी ५७ जागा भाजपाच्या ताब्यात आहेत तर केवळ १५ जागांवर शिवसेना निवडून आली. अजिबातच बहुमत नसतानाही महापौरपदासाठी उमेदवार रिंगणात उतरवायचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतला खरा पण तो शेवटपर्यंत न निभावण्याचा आततायीपणाही केला. रणांगणातून पळ काढण्याची संधी शोधण्यासाठी गटनेता अनंत जोशी यांना पुढे केले. पण त्यासाठी भाजपाचे महानगराध्यक्ष आ. सुरेश भोळे यांच्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करायलाही कमी केले नाही. या सर्वांवर कडी म्हणजे भाजपाशी सामना करण्याची भाषा करणारे मागील दाराने मात्र, भाजपात सामावून घ्या म्हणून भाजपाच्या नेत्यांच्या हातापाया पडत आहेत. याचा गौप्यस्फोट खुद्द आ. सुरेश भोळे, माजी महापौर ललित कोल्हे आणि माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केला आहे.
 
 
शिवसेनेच्या तिकिटावर जनतेमधून निवडून यायचे आणि त्याच जनतेचा विश्‍वासघात करीत कोणतेही भय, लाज न बाळगता सत्तेसाठी विरोधकांच्या पायाशी लोटांगण घालायलाही तयार असणारी ही मंडळी शहराचे खरोखरच भले करतील का? हा प्रश्‍न आहेच. गेल्या ३० वर्षात यांनी शहराचे काय वाटोळे करून ठेवले आहे हे जळगावकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. स्वतःच्या अट्टहासापायी, महत्त्वाचे म्हणजे भाजपाचाच उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असतानाही महापौर निवडणुकीत जळगावकरांचा पैसा आणि वेळ अनाठायी खर्ची घालायला लावणार्‍यांना महापालिकेत राहण्याचा अधिकार उरतोच कुठे? असा प्रश्‍नही उपस्थित होतो.
 
गाढवाने पांघरलेली वाघाची झूल उतरवायला हवी, कार्यकर्त्यांची भावना
महापालिका निवडणुकीपासून कोणताही धडा न घेतलेल्या जळगावमधील शिवसेनेच्या स्वयंघोषित कथित नेत्यांची मस्ती, गाढवाने पांघरलेली वाघाची झूल उतरविण्याचे काम भाजपाच्या नेत्यांनी करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेतून शिवसेना संपवायलाच हवी. कारण, ‘ना रहेगा बास ना बजेगी बासुरी.’ शिवसेनेच्या या कर्त्याधर्त्यांनी जळगावात काय दिवे लावले आहेत हे या पक्षाच्या राज्य नेतृत्त्वालाही कळायलाच हवे.
@@AUTHORINFO_V1@@