उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |

 

 

उल्हासनगर : वाहतूक नियमाचे भंग केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसाला संतप्त तरुणाने भर रस्त्यात मारहाण केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ओ टी सेक्शन परिसरात मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान भरधाव जाणाऱ्या मोटारसायकला थांबविण्याचा प्रयत्न वाहतूक करणाऱ्या वाहतूक पोलीस रावसाहेब काटकर यांना अप्पा मुंडे याने मारहाण केली. त्यावेळी बिलबुक व टोपी खाली पडली.

 

बिलबुक व टोपी घेण्यासाठी खाली वाकलेल्या वाहतूक पोलीस रावसाहेब काटकर अप्पा मुंडे याने मोटारसायकल अडविल्याच्या रागात रावसाहेब काटकर यांना मारहाण केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसाला भररस्त्यात मारहाण करण्याचे चित्रण मोबाइलफोनमध्ये चित्रित होत असल्याचे अप्पा मुंडे यांच्या लक्षात आल्यावर त्याने मारहाण करणे बंद करुन पोलिसांच्या शर्टाची कॉलर पकडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. असून अप्पा मुंडे याला अटक करून पोलिसाला मारहाण, सरकारी कामात अडथळा आणणे आदी अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@