छद्मपुरोगामी कपटजालाचा पर्दाफाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |

 


 
 
नुकताच इस्रोतील नंबी नारायणन प्रकरणात खोटेनाटे पुरावे उभे करून एका प्रतिभासंपन्न शास्त्रज्ञाच्या आयुष्याचे अशा लोकांनी कसे वाटोळे केले, हे देशासमोर आल्याचे प्रकरण ताजेच आहे. अमित शाह यांचे सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात आलेले नाव अशाच कटकारस्थानाचा एक नमुना होता. म्हणूनच नियामुद्दीनने दिलेली साक्ष या लोकांच्या खोटारडेपणाचा ढळढळीत पुरावा ठरतो.
 

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाने गेली जवळपास १२-१३ वर्षे भारतीय राजकारण ढवळून निघाले. सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी हिचे अपहरण करून पोलिसांनी त्यांचा खात्मा केला आणि हे कांड अमित शाह यांच्या आदेशावरूनच घडविण्यात आले, असा पुरोगामी कंपूचा दावा आहे. दुसरीकडे सोहराबुद्दीनच्या कुटुंबीयांनी ही संपूर्ण चकमकच बनावट असल्याचा आरोप करत त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. नुकताच नियामुद्दीन या सोहराबुद्दीनच्या भावाने या चकमकीच्या खटल्यात आपण अमित शाह यांचे नाव घेतलेले नसतानाही सीबीआयने त्यांचे नाव विनाकारण घुसडल्याचा आरोप केला. २००५ साली झालेल्या या घटनेत अमित शाह यांचाच हात असल्याचा आरोप करत देशातल्या तमाम पुरोगामी टोळक्याने एकच धुमाकूळ घातला अन् आता सोहराबुद्दीनच्या भावानेच शाह यांचा सोहराबुद्दीन प्रकरणाशी कसलाही संबंध नसल्याचा खुलासा केला, यामागचे नेमके गौडबंगाल काय? आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरासाठी थोडेसे मागे म्हणजे २००२ सालात डोकावून पाहावे लागेल. २००२ साली गुजरातमधल्या गोध्रा रेल्वेस्थानकावर अयोध्येहून कारसेवा करून परतणाऱ्या रामभक्तांच्या एका डब्याला धर्मांध मुस्लिमांच्या गटाने आग लावली. या आगीत ५९ कारसेवकांचा जळून कोळसा झाला आणि त्यानंतर गुजरातमध्ये संतापाची ज्वाला भडकली. कारसेवकांना अशाप्रकारे जाळून मारल्याने जनतेत त्याची प्रतिक्रिया उमटली आणि गुजरातेत दंगल उसळली. दंगलीत हिंदू आणि मुस्लीम दोन्ही बाजूचे लोक शेकड्याने मारले गेले. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी दंगल आटोक्यात आणण्यासाठी शक्य ते सर्वच प्रयत्न केले आणि पेटलेला गुजरात शमवला, पण देशभरातल्या धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी धेंडांनी लगोलग ही दंगल भडकविण्यामागे नरेंद्र मोदींचाच हात असल्याचा कांगावा करत तमाशा मांडला. गुजरात दंगलीवेळी अमित शाह हे गृहमंत्री होते, त्यांच्यावरही अशाचप्रकारचे आरोप झाले. गुजरात दंगलीचा वापर करून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे, नरेंद्र मोदी व अमित शाह यांना संपविण्याचे खेळ गुजरातेत सुरू झाले.

 

काँग्रेसमध्ये शक्तीशाली असलेल्या व गांधी परिवाराचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांनी या कामी पुढाकार घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना राजकारणातून उठविण्याचा चंग बांधला. आणीबाणीत ज्याप्रकारे इंदिरा गांधींनी विरोधकांना तुरुंगात डांबत-कोंडत उद्ध्वस्त करण्याचे धोरण राबवत अन्यायाचा वरवंटा फिरवला. त्यापेक्षाही भयंकर डाव अहमद पटेलांच्या कपटजालातून बाहेर पडू लागले. भविष्यात जी व्यक्ती आपली शत्रू ठरू शकते, देशपातळीवरचे नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकते, त्या नेतृत्वाला संपविण्यासाठी मग मोदी आणि शाह यांच्याविरोधात आरोपांचे, न्यायालयीन याचिकांचे सत्र चालविण्यात आले. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात अमित शाह यांचे गोवले गेलेले नाव त्याचाच एक भाग होता. विशेष म्हणजे ज्या गुजरात दंगलीचे भांडवल करत तिस्ता सेटलवाडसारख्यांनी पीडितांचे अश्रू पुसण्याचा आव आणत लाखो रुपये लाटले, त्याच तिस्ता सेटलवाडांनी सोहराबुद्दीन प्रकरणातही घुसखोरी केली. एसआयटी चौकशी, सीबीआय चौकशीपासून ते मोदी-शाह जोडीमुळे गुजरातेतील न्यायालयांत सोहराबुद्दीनला न्यायच मिळणार नाहीचा कांगावा करत या लोकांनी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात हलवण्याची मागणी केली. पुरोगामी भामट्यांनी यासाठी खोटे साक्षी-पुरावे निर्माण केले, पण न्यायालयात त्याचा टिकाव लागला नाही. नुकताच इस्रोतील नंबी नारायणन प्रकरणात खोटेनाटे पुरावे उभे करून एका प्रतिभासंपन्न शास्त्रज्ञाच्या आयुष्याचे अशा लोकांनी कसे वाटोळे केले, हे देशासमोर आल्याचे प्रकरण ताजेच आहे. अमित शाह यांचे सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात आलेले नाव अशाच कटकारस्थानाचा एक नमुना होता. म्हणूनच नियामुद्दीनने दिलेली साक्ष या लोकांच्या खोटारडेपणाचा ढळढळीत पुरावा ठरतो.

 

सोहराबुद्दीनच्या कुटुंबीयांनी, न्यायालयात याचिका दाखल केलेल्या नियामुद्दीनने अमित शाह यांचे नाव घेतलेले नसतानाही त्यांचे नाव यात आलेच कसे? तर काँग्रेसच्या सत्ताकाळात देशात मानवताधिकारवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि आणखी कसल्या कसल्या कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवी संस्थांचे पेवच फुटले. प्रकरण कोणतेही असो, त्यात हस्तक्षेप करत धुडगुस घालायचा आणि आम्ही म्हणतो तेच कसे गुन्हेगार आहेत, हे सांगण्यासाठी गळे काढायचे, असा या लोकांचा शिरस्ता झाला. परकीय निधीवर पोसलेल्या या लोकांनी माध्यमांत बसलेल्या बड्या बड्या बोरुबहाद्दरांना हाताशी धरायचे आणि यांच्या दृष्टीने जो गुन्हेगार असेल, त्याच्याविरोधात आरोपांची राळ उडवून द्यायची, असा एककलमी कार्यक्रम राबविण्यात आलाअमित शाह यांचे नाव अशाच लोकांकडून आले आणि त्यांच्याच शब्दांना प्रमाण मानणाऱ्यांनी ते नाव थेट नियामुद्दीनच्या जबानीत घातले. यातूनच मोदी-शाह यांच्या नावाने गोंधळ घालणाऱ्यांची कार्यशैली लक्षात येते. देशातल्या कित्येक प्रकरणांत या लोकांनी अशाच प्रकारचे कुटील डाव रचल्याचे आपल्याला दिसून येईल. बडोद्यातील बेस्ट बेकरी जळीतकांडातील झाहिरा शेख या मुलीचे साक्षीप्रकरण, एहसान जाफरी प्रकरण, कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आणि मागच्या काही महिन्यांत ज्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला त्या न्या. लोया प्रकरणातही पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, मानवताधिकारवादी कार्यकर्त्यांची हिंदुत्वविरोधी, मोदी-शाह, भाजप-संघविरोधी कार्यशैली ठळकपणे समोर आली. या लोकांनी खेळलेल्या प्रत्येक कुटील डावात देशातल्या बुद्धीजीवींनी, नामवंत कायदेपंडितांनी आणि पत्रकार मंडळींनीही पुरेपूर साथ दिली. आता मात्र मागच्या १५-२० वर्षांत या लोकांनी केलेली पापे नेमकेपणाने चव्हाट्यावर येत असून या लोकांचे मुखवट्याआडचे अस्सल चेहरेही समोर येत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@