काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाटणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |



ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील मुख्य दलालाचा भारताला ताबा मिळणार

 

नवी दिल्ली : २०१० साली काँग्रेसच्या काळात गाजलेला ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याला महत्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य दलाल ख्रिस्तीयन मिशेलचा ताबा भारताला मिळणार आहे. मिशेलचे भारताला प्रत्यार्पण करण्याचे संयुक्त अरब अमिराती न्यायालायने आदेश दिले आहेत. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने संयुक्त अरब अमिरातीला प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्याला यूएई प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाटणार असून हा घोटाळा कोणी केला आणि कोणाला लाच मिळाली याची माहिती उघड होण्यास मदत होणार आहे.

 

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी मिशेल हा प्रमुख दलाल असून त्याने भारतीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. याबाबत ईडीने २०१६ साली मिशेलविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. तो युएईमध्ये वास्तव्याला असल्याने भारत सरकारने त्याच्या अटकेची मागणी युएईला केली होती. युएईने गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याला अटक केली. तेव्हापासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रक्रिया सुरू होती. अखेर भारताच्या या मागणीचा यश आले असून युएईने मिशेलच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@