जळगावात रंगणार विभागीय अबॅकस स्पर्धा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |

 

जळगावात रंगणार विभागीय अबॅकस स्पर्धा !
जळगाव ,
 येथील मॉडर्न जिमनॅशियम हॉल, गुळवे विद्यालय येथे २० सप्टेंबर २०१८ (रविवार) रोजी विभागीय एस.आय.पी. अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या स्पर्धेमध्ये अबॅकस च्या सहाय्याने अवघ्या ५ मिनिटात विद्यार्थ्यांना १२५ अंकगणितीय समीकरणे सोडविण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. स्पर्धेत जळगाव ,धुळे ,अमळनेर ,शिरपूर ,शिंदखेडा,अकोला ,बुऱ्हानपूर ७०० विद्यार्थ्यांसमवेत सहभागी होणाऱ्या पालकांसाठी सुद्धा हा लक्ष्यवेधी आणि चित्तथरारक अनुभव आहे.स्पर्धेचे उदघाटन जिल्हापरिषदेचे शिक्षण विभाग समितीचे सभापती पोपट तात्या भोळे यांच्या हस्ते करण्यात येणार असून ,जिल्हा क्रीडा अधिकारी  सुनंदा पाटील प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
एस.आय.पी अकॅडेमी आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलांच्या कौशल्य वर्धानाच्या अनुषंगाने ‘अबॅकस’ प्रशिक्षणाचे कार्य करीत हे. भारतात गेल्या १५ वर्षात ७०० अध्ययन केंद्राच्या माध्यमातून आजतागायत ७ लाखापेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.शालेय मुलांच्या अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी आम्ही एकाग्रता,श्रवण कौशल्ये ,निरिक्षण कौशल्ये,स्मरण शक्ती, इ. कौशल्ये विकसित करण्यासाठी अविरत परिश्रम घेत आहोत .
एस.आय.पी अकॅडेमी दरवर्षी विभागीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर अबॅकस स्पर्धांचे आयोजन करणारी एकमेव संघटना आहे, या संदर्भात एकाच छताखाली सुमारे ५००० विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल एस.आय.पी. अकॅडेमी चे पाच वेळा लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या कौशल्यविकासासाठी कार्य करणारी सर्वोत्कृष्ट संस्था असा पुरस्कार ही अकॅडेमीला मिळाला आहे.भारतभर पसरलेल्या ७०० अध्ययन केंद्राच्या माध्यमातून शालेय मुलांना विशेषतः ६ ते १२ वयोगटातील मुलांना ११ स्तरावर प्रशिक्षण अबॅकस
च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात गतिशील अंकगणितासोबतच , ब्रेन जिम ( दोन्ही मेंदूंना कार्यान्वित करणारे व्यायाम ) ,स्पीड रायटिंग ( गतिशील लेखन तंत्र ),या घटकांचा समावेश होत असतो. अबॅकस मध्ये नैपुण्य मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो,सर्वामुळेच ते गतिशील होत जातात ,आणि कितीही अवघड समीकरणे ते क्षणात सोडवू शकतात ,  नैपुण्य दाखविण्याची संधी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून मिळत असते ,आणि पाच मिनिटातच त्यांना लक्ष साध्य करवयाचे असते.हा चित्तथरारक अनुभव सर्व विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावा ,असे आवाहन विभाग प्रमुख राजेंद्र नन्नवरे यांनी केले आहे .
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@