डिजेला परवानगी नाहीच, न्यायालयाने खडसावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Sep-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : डिजे व डोल्बीच्या वापराला कोर्टाने परवानगी द्यावी. तसेच त्यावरील बंदी उठविण्यात यावी याचिका एका याचिकाकर्त्याने दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी करण्यात आली. ध्वनीप्रदूषणाचा विचार करता डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवागनगी देणे शक्य नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. डिजेचा वापर सार्वजनिक ठिकाणी करणाऱ्यांवर पोलिस केवळ कारवाई करू शकतात. मात्र ते त्यांना रोखू शकत नाहीत असे राज्य सरकारने हायकोर्टास सांगितले. तसेच गेल्या वर्षभरात ध्वनीप्रदूषणाचे जे खटले दाखल करण्यात आले. त्यापैकी ७५ टक्के प्रकरणे ही डिजेची असल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@