अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते!; सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

 
 

नवी दिल्ली : "माझी साक्ष जेव्हा घेण्यात आली होती तेव्हा मी पोलीस अधिकारी अभय चुडासामा आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांची नावे घेतली नव्हती. सीबीआयने स्वत:हून या दोन नावांचा माझ्या जबाबात समावेश केला,” असा दावा नयामुद्दिन शेख याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर केला आहे. नयामुद्दिन शेख हा पोलीस चकमकीत ठार मारल्या गेलेला सोहराबुद्दिन शेख याचा लहान भाऊ आहे. तो सोहराबुद्दिन शेख बनावट चकमक प्रकरणातील एक साक्षीदार आहे. सीबीआय अधिका-यांनी २०१० साली नयामुद्दिनची साक्ष नोंदवली होती, त्यावेळच्या साक्षीप्रकरणी त्याने हा दावा केला आहे. नयामुद्दिन २९ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यायालयासमोर साक्षीसाठी हजर होणे आवश्यक होते पण समन्स, अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर नयामुद्दिन सोमवारी न्यायालयासमोर हजर झाला.

 
 
या प्रकरणात ज्यांनी साक्ष फिरवली त्यांच्या आणि सीबीआय विरोधात एफआयआर नोंदवण्याची त्याने न्यायालयाला तोंडी विनंती केली. सीबीआयने या संपूर्ण खटल्याची वाट लावल्याचा त्याने आरोप केला. ”माझ्या जबानीमध्ये बरेच काही आहे, जे मला सांगायचे आहे,” असे नयामुद्दिनने न्यायालयाला सांगितले. ”मला भाजपकडून कुठलाही धोका नाही. मी कधीही आझम खानचे नाव ऐकले नाही. सीबीआयचे तपास अधिकारी दागर गावातील माझ्या घरी आले होते. मी त्यांच्यासमोर आझम खान मला भेटल्याचे किंवा अभय चुडासामा यांनी सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेण्यासाठी मला ५० लाख रुपये देऊ केले, असे म्हटलेले नाही. २०१० सालच्या माझ्या जबानीत फेरफार करून काही गोष्टींचा समावेश करण्यात आला. तसे मी कधीच म्हटले नव्हते, यासंबंधी अहमदाबादमधील विशेष न्यायालयात मी प्रतिज्ञापत्रही सादर केले होते,” असेही नयामुद्दिनने विशेष सीबीआय न्यायालयाला सांगितले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 

 
@@AUTHORINFO_V1@@