धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार राज ठाकरेंना कुणी दिला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |


 


प्रसिद्धीविनायक व्यंगचित्रावरून सोशल मीडियावर विचारला जातोय प्रश्न

 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिम्मित राज ठाकरे यांनी काढलेले प्रसिद्धीविनायक व्यंगचित्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा व देव देवतांची विटंबना केल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार राज ठाकरेंना कुणी दिला? असाही प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. यामुळे आपल्या व्यंगचित्रासाठी प्रसिद्ध असलेले मनसे अध्यक्ष प्रसिद्धीविनायक व्यंगचित्रामुळे वादाचा विषय ठरले आहेत.
 
 
 
 

राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा अपमान केला आहे. गणपतीच्या रूपात मोदींना दाखवले असून खाली उंदीर म्हणून अमित शाह यांना दाखवले आहे. अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह ही मंडळी गणपतीला म्हणजे मोदींना ओवाळताना दिसत आहेत.

 
 
 

 

 
राज ठाकरे सोशल मीडियावर सक्रिय झाल्यापासून व्यंगचित्र काढून सतत प्रकाशझोतात राहत असतात. त्यांचे व्यंगचित्र राज्यभर मोठ्या चवीने चाखले जाते. मात्र प्रसिद्धीविनायक व्यंगचित्राने मात्र ही चव बिघडल्याचे दिसून येत आहेत. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसादिवशीच व्यंगचित्र काढल्याने जनतेत संतापाची लाट दिसून येत आहे.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@