मुंबईतील सीएसआयए विमानतळ जगात भारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |


 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ होण्याचा मान मिळाला आहे. एअरपोर्ट्स काऊन्सिल इंटरनॅशनल (एसीआय)द्वारे झालेल्या सर्वेक्षणात हा मान मिळाला. एसीआयने प्रवाशांना विमानतळावर देण्यात येणाऱ्या सुविधांचा अभ्यास करून आणि प्रवाशांच्या अनुभवांचा विचार करून हा पुरस्कार दिला आहे. कॅनडामध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 
 

हा पुरस्कार मिळाल्याची माहिती सीएसआयएच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आली. यापूर्वीही सीएसआयएला या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दरम्यान, १९५३ विमानतळांमधून आणि ३४ निकषांना खरे उतरून सीएसआयएला मिळालेला हा पुरस्कार नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुंगटीवार यांनी सीएसआयएचे आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@