काँग्रेस आमदारावर उधळले पैसे, व्हिडिओ व्हायरल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

 

 
 
 
  
मुंबई : काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर दोनजण पैसे उधळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील चांदिवली येथील मतदार संघातून ते निवडून आले होते. गणेशोत्सवादरम्यान नसीम खान एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे त्यांच्यावर ही पैशांची उधळण करण्यात आली. या घटनेमुळे नसीम खान यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.
 


 

याविषयी नसीम खान यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. आपली बाजू सावरताना ते म्हणाले की भानुशाली समाजाच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात मी गेलो होतो. मी थोड्या वेळासाठीच तिथे उपस्थित होतो. यादरम्यान मंडपात माझ्यावर दोन जण पैशांची उधळण करू लागले. ही मी त्यांची परंपरा समजून व त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. असा माझा उद्देश होता. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांनी माझे ऐकले नाही. परंतु असा कोणताही प्रयत्न करताना नसीम शेख या व्हिडिओत दिसत नाहीत. उलटपक्षी ते या व्हिडिओत स्मित हास्य करताना दिसत आहेत. याप्रकरणी काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@