चाळीसगाव तालुक्यातील धडपिंप्री शाळेत १५ लाख देऊनही नियुक्ती नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

संस्थाचालक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
जळगाव, १७ सप्टेंबर
पारोळा येथील विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेच्या चाळीसगाव तालुक्यातील धडपिंप्री शाळेत शिक्षक भरती करण्यात आली. मात्र, यात काही शिक्षकांकडून भरतीसाठी १५ लाख रुपये घेऊनही त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी संस्थाचालक डी.एम.पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिल्याचे महाराष्ट्र अघोषित समितीच्या राज्य अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी सांगितले.
 
 
पारोळा तालुक्यातील वाघ्रा- वाघरी व सावखेडा येथे विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेच्या शाळा आहेत. संस्थेचे चेअरमन डी.एम.पाटील यांनी संस्थेच्या शाळांमध्ये नोकरीस लावून देण्याकरिता मोहन भास्कर अहिरे यांच्याकडून १५ लाख व विजय सुरेश बागुल यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले. सदर रक्कम घेऊन धडपिंप्री येथे शाळा असल्याचे दाखवून तेथे काम करण्यास सांगितले. अहिरे व बागुल हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून काम करत असताना या कालावधीत नियुक्तीपत्र देण्यात आले नाही तसेच पगारही देण्यात आलेले नाही. याबाबत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार दिली. भास्कर पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून शिक्षणमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे शुभांगी पाटील यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@