महापौर, उपमहापौर निवडीसाठी मनपाची विशेष महासभा आज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

पक्षीय बलाबल
भाजपा :- ५७, शिवसेना :-१५, एमआयएम :-०३

 

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
जळगाव, १७ सप्टेंबर
जळगावचा महापौर व उपमहापौर मंगळवारी (दि.१७) ठरणार असून, त्यासाठी विशेष महासभा महापालिकेत सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
 
 
भाजपातर्फे आ. सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तर उपमहापौरपदासाठी डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदासाठी प्रशांत सुरेश नाईक यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. भाजपाचे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक ७ चे प्रतिनिधीत्व करतात.
 
 
महापालिकेत भाजपाचे संख्याबळ ५७ असून, त्या खालोखाल शिवसेना १५ आणि एमआयएम ३ जागा अशी स्थिती आहे. शिवसेना नेत्यांच्या दाव्यानुसार त्यांचा महापौर निवडून येण्यासाठी त्यांना अजून २० नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. पण महापालिका प्रशासनाने शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे निमित्त साधून पक्षाने महापौर निवड प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सायंकाळी पक्षाचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी पत्रपरिषद घेऊन महापौर आणि उपमहापौरपदासाठी गोपनीय पद्धतीने मतदान झाल्यास शिवसेना उमेदवारांना ४० पेक्षा अधिक मते मिळतील, असा दावा केला होता. महापौर निवडीसाठी सकाळी ११ वाजता विशेष महासभा होईल. ११ ते ११.१५ वाजेपर्यंत अर्ज छाननी आणि ११.३० वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. गरज भासल्यास महापौर व उपमहापौर निवडीसाठी मतदान घेतले जाणार आहे.
 
भाजपाच्या ‘व्हीप’चा विरोधकांकडून बागुलबुवा
महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाने आपल्या नगरसेवकांसाठी व्हीप (पक्षादेश) जारी केला आहे. पक्षाने यापूर्वीही वेगवेगळ्या पदांच्या निवडणुकीप्रसंगी व्हीप जारी केला होता. त्याचा विरोधक जेवढा बागुलबुवा करीत आहेत, तेवढे त्यात नावीन्य काहीच नाही. महापौर निवड बिनविरोध होईल, असा दावाही भाजपाच्या सूत्रांनी केला.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@