प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१७-१८ प्रदान केले. २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ विद्यालय उपक्रमाचा हा एक भाग आहे.

 
स्वच्छता अभियान ही लोक चळवळ बनली असून देशात सर्वत्र स्वच्छतेचा आग्रह दिसत आहे, असे ते म्हणाले. शाळांमध्ये स्वच्छता उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येईल असेही ते म्हणाले. विद्यार्थी हे स्वच्छतादूत असून जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न ते प्रत्यक्षात साकारतील असे त्यांनी सांगितले. या पुरस्कारासाठी ६ लाख १५ हजार १५२ शाळांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या दुपटीने अधिक आहे. पुरस्कार प्राप्त शाळांना मान्यता पत्रासह ५० हजार रुपये अतिरिक्त अनुदान देण्यात येते. पाणी, स्वच्छता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कारांनी गौरवण्यात येते. या वर्षी प्रथमच सरकारी शाळांखेरीज खाजगी शाळांनाही पुरस्कार देण्यात आले आहेत.
 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@