जामनेर ‘वन बूथ टेन यूथ’ मध्ये राज्यात अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

ना.गिरीश महाजन यांची माहिती; शहापूर, देऊळगाव जि. प. गटात मेळावा

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
जामनेर, १७ सप्टेंबर
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या संकल्पनेतून प्रत्येक लोकसभा तसेच विधानसभा क्षेत्रात ‘वन बूथ टेन यूथ’ हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जामनेर तालुका ‘वन बूथ टेन यूथ’ रचनेत जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक नंबर असल्याची माहिती ना. महाजन यांनी दिली. असे बूथ मेळावे रावेर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातदेखील राबवण्यात येत आहे. सोमवारी जामनेर तालुक्यात देखील ‘वन बूथ टेन यूथ ’हा कार्यक्रम जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे तसेच जामनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर शहराचा बूथ मेळावा घेण्यात आला.
 
 
ना. महाजन पुढे म्हणाले की, जामनेर शहरात ३२ बूथ असून प्रत्येक बूथवर प्रमुख निवडण्यात आले आहे. आणि त्यांच्या टीममध्ये त्यांनी प्रत्येकी ३०च्यावर सदस्य नोंदणी बूथ प्रमुखांनी केली आहे. कोणतेही जाती-पातीचे राजकारण भाजपा करत नाही. ही रचना आपली देशभरात सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रात्रंदिवस देशभरात पक्षासाठी फिरत आहे. लोकांच्या मनामनातदेखील मोदी आणि भाजप आहे, त्यासाठी देशात, राज्यात भाजप निवडून येण्यासाठी बूथ प्रमुखांनीदेखील आपल्याला दिलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी.
 
 
यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती राजनीताई चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे, ज्येष्ठ नेते शिवाजी सोनार, छगन झाल्टे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, विस्तारक नवल पाटील, शंकर मराठे, अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, अमर पाटील, वासुदेव घोंगडे, हेमंत वाणी, सन्माननीय नगरसेवक, सर्व शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे तर आभार सुभाष पवार यांनी मानले.
 
 
जामनेरमध्ये मंत्री महाजन यांच्यामुळेच विकासकामे
खा. रक्षाताई खडसे यांनीही बोलताना सांगितले की, संघटनेच्या बाबतीत जामनेरचे काम चांगले आहे. विशेष म्हणजे १०० टक्के बूथ प्रमुख आणि शक्ती प्रमुखांची उपस्थिती आहे. ज्याप्रमाणे मोदी सरकारचे व्हिजन आहे ‘सबका साथ सबका विकास’याचप्रमाणे सरकार काम करीत आहे. परंतु, ही माहिती लोकांकडे पोहोचविण्याचे काम तुमचे आहे. जामनेर शहरातदेखील ना.गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने बरीच विकासकामे झाली आहे. काही सुरूदेखील आहे तर काही पुढे होणारही आहे.’वन बूथ टेन यूथ’ यारचनेमार्फत वाढवा, त्याचप्रमाणे तुमच्या कार्याचादेखील आढावा प्रदेशावर जात आहे. आणि तुमच्या कार्याची दखलदेखील घेतली जात आहे. यासाठी पक्ष वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@