लालबागच्या राजाची ४२ लाखांची सोन्याची मूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |
मुंबई : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राज्याला एका भक्ताने तब्बल ४२ लाखांची सोन्याची मूर्ती दान केलू आहे. लालबागच्या राजा मंडळाला भाविक दरवर्षी कोट्वधींचे दान करतात. मात्र, भाविकाने दान केलेली ही सोन्याची मूर्ती यंदा विशेष आकर्षण ठरत आहे. मूर्तीच्या मुकूटात हिरा असल्याचं सांगण्यात येत आहे. मूर्तीच्या मुकूटात असलेल्या हिऱ्याची किंमतच लाखभर रुपये आहे. मूर्तीचे वजन १ किलो २७१ ग्रॅम आहे. सध्या सोन्याचा बाजारभाव ३१ हजार ६७० रुपये प्रतिदहा ग्रॅम आहे. त्यावरून मूर्तीच्या किमतीचा अंदाज येऊ शकतो. गेल्यावर्षीही एका भाविकांनं ३१ लाख ५० हजारांची मूर्ती दान केली होती. या वर्षीच्या दानाची रक्कम अद्याप मंडळानं जाहिर केलेली नाही. गेल्यावर्षी 'लालबागचा राजा'ला भाविकांनी कोटी ७५ लाखांचे दान दिले होते. यात सोने आणि चांदीच्या मूर्तीसह दागिन्यांचा समावेश आहे.
 
 

   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@