सौंदर्य दृष्टीने ‘शासकीय’ कार्यालयांचा कायापालट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |


 

आमदार किसन कथोरे अभिष्टचिंतन

 

सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रशासकीय कार्यालयांमधून होत असते. लोकशाही व्यवस्थेचे केंद्रस्थान मानल्या जाणार्‍या या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर प्रशासकीय कामकाजात खर्‍या अर्थाने गतिमानता आणता येईल, या हेतूने मुरबाड बदलापूरचे आ. किसन कथोरे यांनी प्रशासकीय इमारतींचा चेहरामोहरा बदलला आहे. अंबरनाथमध्ये आ. किसन कथोरे यांनी प्रशस्त प्रशासकीय भवन उभारून राज्यात नवा आदर्श घडविला होता. हीच क्रिया त्यांनी मुरबाडमध्ये करावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मुरबाडकरांची ही इच्छा कथोरे यांनी पूर्ण केली आहे. विदेशात गेल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेत तिथल्या कार्यालयात्मक सौंदर्यप्रधान रचना तिथे वास्तुविशारदांच्या कल्पकतेतून खाजगी व सरकारी वास्तुप्रसाद पाहून आपलं मन प्रसन्न होते. तेथे व्यवस्था या जनसामान्यांसाठी असतात. तेथील मांडणी व रचना आकर्षक असेल तर येणार्‍यांचा मनोभाव सकारात्मक असतोच. आपल्याकडील शासकीय कार्यालये बघितली की तेथून काढता पाय घेण्याचा सहज भाव आपल्यात उत्पन्न होतो. ग्लोबलायझेशनचं पर्व 91 च्या दशकात सुरू झालं असलं तरी आपली शासकीय कार्यालये अद्याप पारंपरिक पद्धतीत अडकलेली आहेत. फायलींचे ढिगारे इतस्ततः पडलेले, मोडकळीस आलेली कपाटे, अपुर्‍या खुर्च्या अन् नकारात्मक जाणिवेचे प्रश्नार्थक मुद्रेत बसलेले कर्मचारी पाहून सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांचा कामासाठी जाण्याचा सोपस्कार नकोसा वाटतो.

 
 

सर्वसामान्य जनतेसाठी शासनाने जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी प्रशासकीय कार्यालयांमधून होत असते. लोकशाही व्यवस्थेचे केंद्रस्थानमानल्या जाणार्‍या या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर प्रशासकीय कामकाजात खर्‍या अर्थाने गतिमानता आणता येईल, या हेतूने मुरबाड बदलापूरचे आ. किसन कथोरे यांनी प्रशासकीय इमारतींचा चेहरामोहरा बदलला आहे. मुरबाड हा शेतीप्रधान तालुका आहे. येथील बहुसंख्य शेतकरी आपल्या जागेच्या कामकाजासाठी तहसीलदार कार्यालयात येतात. मात्र या कार्यालयात अपुरी जागा असल्याने शेतकर्‍यांना आणि नागरिकांना कार्यालयाबाहेर उभे राहावे लागते. तसेच येथे काम करणार्‍या अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना कामासाठी पोषक वातावरण नाही. तसेच ही वास्तू जुनी झाल्याने त्याचा त्रास सर्वांनाच होत होता. मुरबाडमध्ये प्रशस्त तहसीलदार कार्यालय असावे, ही सर्वांचीच इच्छा होती. अंबरनाथमध्ये आ. किसन कथोरे यांनी प्रशस्त प्रशासकीय भवन उभारून राज्यात नवा आदर्श घडविला होता. हीच क्रिया त्यांनी मुरबाडमध्ये करावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मुरबाडकरांची ही इच्छा कथोरे यांनी पूर्ण केली आहे. मुरबाड तालुक्याचे तहसीलदार कार्यालय हे अपुरे पडत असल्याने आ. किसन कथोरे यांनी नव्या प्रशस्त इमारतीचा प्रस्ताव तयार करून तो मंजूर केला आहे. या नव्या वास्तूचे संकल्पचित्र पाहिल्यावर ही शासकीय इमारत नव्हे तर एखादा राजवाडा असल्याचा भास होतो. जागतिकीकरणाच्या युगात सध्या सर्वत्र खाजगीकरणाचा बोलबाला आहे. सार्वजनिक उपक्रमांमध्येही खाजगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. मात्र कार्यतत्पर आणि कल्पक दृष्टिकोन असेल तर ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब,’ ही म्हण खोटी ठरविता येते. हे आ. किसन कथोरे यांनी शासकीय इमारतींचा कायापालट करून दाखवून दिले आहे.

 
 

थितबी होणार पर्यटनग्राम

उपरोक्त विविध योजनांमुळे माळशेज आता महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर ठळकस्थानी असणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महानगरांपासून जवळ असल्याने देश-विदेशांतून येथे पर्यटक येतील. घाटमाथ्यावरील एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये त्यांच्यासाठी पंचतारांकित सुविधा असतील. शिवाय, पायथ्याशी असणार्‍या थितबी गावात आदिवासी संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना घडेल. येथे पर्यटकांना आदिवासींच्या कुडाच्या झोपडीत राहण्याचा आनंद घेता येणार आहे. अर्थात या झोपड्याही अद्ययावत सुविधांनी युक्त असणार आहेत. आदिवासी कला संस्कृतीची ओळख येथे पर्यटकांना करून दिली जाणार आहे.

 

बारवी डॅमजवळ इको -टुरिझम

बारवी धरणाच्या शेजारी वनविभागाच्या माध्यमातून इको-टुरिझमचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून धरणाच्या परिसरात उद्यान विकसित करण्यात येणार आहे. तसेच जंगल लष्करी वनखात्याच्या माध्यमातून साकार करण्यात येत आहे. एक आगळावेगळा पिकनिक स्पॉट येथे साकारण्याचा आ. किसन कथोरे यांचा प्रयत्न आहे.

 

मुरबाडचा ‘अर्थ’ चेहरा बदलतोय...

नेतृत्व हे जमिनीचं असलं की, त्या मातीच्या प्रश्नांची आत्मजाण आपसूकच नेतृत्वाला असते. कथोरेंचा जीवनप्रवास हा त्या आत्मजाणिवेची पाऊलवाट म्हणावी लागेल, म्हणून गोरगरिबांचे प्रश्न सोडविताना ते लोकांमध्ये घरातल्या कुटुंबातल्या कर्त्याप्रमाणे राहिले. ग्रामीण भागाचा कायापालट व्हावा, इथे आर्थिक सुबत्ता यावी व शेती व्यवसायाला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी कृषिक्षेत्रात या मतदारसंघात प्रचंड काम केले आहे. वर्षानुवर्षे रखडलेले सिंचनाचे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले. मुरबाड मतदार संघाची भौगोलिक रचना निसर्गात या अडीच तालुक्यांच्या विभागणीत झाली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं निर्सगलेणं या भागाला माळशेज घाटाच्या स्वरूपात लाभलं आहे. काळू, भातसा, बारवी या नद्यांनी हा भूपृष्ठ समृद्ध झाला आहे. असे असले तरी मुरबाड मतदार संघाच्या परिक्षेत्रातील दरडोई उत्पन्नाचा मानवी निर्देशांक अत्यल्प असा आहे.

 
 

 
 
 
 
१२५ नंबरवर जावी इतकी घसरण या भागाची झाली आहे. मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करीत असताना ही परिस्थिती बदलण्याचं आव्हानात्मक काम किसन कथोरेंनी सुरू केलं आहे. त्यासाठी त्यांना असलेले आत्मभान महत्त्वाचं. त्यासाठी आ. किसन कथोरेंच्या जीवनाच्या पार्श्वभूमीचा इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. बारवी धरण क्षेत्रात विस्थापित झालेल्या गरीब शेतकर्‍याच्या घरी त्यांचा जन्म झाला. आर्थिक हलाखीत त्यांना जीवन व्यतीत करावं लागलं. विस्थापितांच्या वंचना त्यांच्याही वाट्याला आल्या, त्यातूनच कसोशीने संघर्ष करत त्यांनी यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू केली. नेतृत्व हे जमिनीचं असलं की, त्या मातीच्या प्रश्नांची आत्मजाण आपसूकच नेतृत्वाला असते. कथोरेंचा जीवनप्रवास हा त्या आत्मजाणिवेची पाऊलवाट म्हणावी लागेल, म्हणून गोरगरिबांचे प्रश्न सोडविताना ते लोकांमध्ये घरातल्या कुटुंबातल्या कर्त्याप्रमाणे राहिले. ग्रामीण भागाचा कायापालट व्हावा, इथे आर्थिक सुबत्ता यावी व शेती व्यवसायाला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी कृषिक्षेत्रात या मतदारसंघात प्रचंड काम केले आहे. वर्षानुवर्षे रखडलेले सिंचनाचे प्रकल्प हाती घेऊन ते पूर्णत्वास नेले. पारंपरिक कृषी पद्धतीत शेतकर्‍यांना त्यांनी बदल घडवून आणायला सांगितले. त्यासाठी शासन स्तरावर अभिनव उपक्रम राबविले, कृषि मेळावे आयोजित केले. त्याचा परिणाम असा झाला की, या क्षेत्रातून भाजीपाला निर्यात होऊ लागला आहे. शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायासाठी त्यांनी प्रवृत्त केले, त्यातून दुग्धउत्पादन शृंखला वाढली. शेतकर्‍यांना बांधबंदिस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर करून दिली. कृषिसह फलोत्पादनातही हा भाग समृद्ध व्हावा म्हणून त्यांनी काम सुरू केले आहे. कृषी समृद्धीबरोबरच या भागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचा पर्यटनात्मक उद्योगात रूपांतरण करण्याचा कृति आराखडा त्यांनी आखला व तो पूर्णत्वास नेला. आधुनिक युगात औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यटन विकासही स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचे उत्तम साधन होऊ शकेल. हे ओळखून पायाभूत सुविधांबरोबरच महत्त्वाकांक्षी योजना राबवून अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील पर्यटनस्थळांना नवी झळाळी दिली व नवी ओळख दिली. माळशेज ते मलंगगड पट्ट्यात पर्यटनस्थळांची एक मालिकाच त्यामुळे साकार होऊ लागली आहे. सह्याद्रीच्या अखेरच्या डोंगररांगांमधील श्री मलंगगडावरील फ्युनिक्युलर रेल्वे हा या मालिकेतील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. ठाणे-पुणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांना जोडणारा माळशेज घाट तेथील धबधब्यांमुळे पावसाळी पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या घाटमार्गात विविध योजना राबवून आ. किसन कथोरे यांनी माळशेजला बारमाही पर्यटनाचे केंद्र बनवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे विकसित केलेल्या टेहळणी बुरुजांमुळे माळशेज आता थेट माथेरान आणि महाबळेश्वरच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. येथील दोन टेहळणी बुरुजांदरम्यान रोप-वे साकारण्यात येणार आहे.
 

शिक्षणातून सामाजिक विकास

आजच्या जमान्यात दप्तराच्या ओझ्याची मोठी चर्चा होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विचारमंथन व उपाययोजना हाती घेण्यात येत आहे, पण सन 1997 साली किसन कथोरेंनी पाटी दप्तराविना शाळा उपक्रम सुरू करून तो यशस्वी केला. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, दर्जेदार स्वरूपात मिळत असताना बदलत्या वैश्विक शिक्षणपद्धतीनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी कल्याण तालुक्यात दोन, मुरबाडमध्ये दोन व बदलापूरमध्ये तीन व अंबरनाथमध्ये चार वरिष्ठ महाविद्यालयांना मंजुरी मिळवून घेतली.

 
 

 

 

शिक्षण हे माणसाच्या आयुष्यातील परिवर्तनाचे माध्यम आहे. सर्वंकष विकासासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. ते प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांना गुणात्मक पद्धतीने मिळावे यासाठी अनेकांगी उपक्रम आ. किसन कथोरेंनी अभिनव पद्धतीने राबविले. नव्वदच्या दशकात ग्लोबलायझेशनच्या वातावरणामुळे शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ घातले होते. वैश्विक भाषा म्हणून ‘इंग्रजी’ भाषा प्रभुत्वाकडे विद्यार्थ्यांनी जावं यासाठी अंबरनाथ तालुक्यात सभा असताना पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण जि. प. च्या शाळेत सुरू केले. भाषा अवगत व्हावी म्हणून उपक्रम राबविले. शाळांमध्ये इंग्रजी भाषेचे शिक्षण पहिलीपासूनच सुरू केले. आजच्या जमान्यात दप्तराच्या ओझ्याची मोठी चर्चा होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विचारमंथन व उपाययोजना हाती घेण्यात येत आहे, पण सन 1997 साली किसन कथोरेंनी पाटी दप्तराविना शाळा उपक्रम सुरू करून तो यशस्वी केला. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, दर्जेदार स्वरूपात मिळत असताना बदलत्या वैश्विक शिक्षणपद्धतीनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी कल्याण तालुक्यात दोन, मुरबाडमध्ये दोन व बदलापूरमध्ये तीन व अंबरनाथमध्ये चार वरिष्ठ महाविद्यालयांना मंजुरी मिळवून घेतली. महाविद्यालयांची ही रचना कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, बदलापूर परिक्षेत्रासाठी शैक्षणिक संजीवनी ठरली. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी ठाणे व मुंबईची वाट धरावी लागत होती. हजारो तरुणांच्या जीवनात त्यांनी शैक्षणिक प्रकाशवाट साकारली. विशेष म्हणजे हे करीत असताना औद्योगिक प्रशिक्षण, अभियांत्रिकी शिक्षणाच्या सुविधा येथील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात म्हणून रचनात्मक कार्य केले. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारखानदारीचं औद्योगिक क्षेत्र आहे. या कारखान्यात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता होती. त्याबाबत त्यांनी शासकीय स्तरावर काम करून औद्योगिक प्रशिक्षणाच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. कल्याण, मुरबाड, बदलापूर या त्रिकोणमितीय पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक ‘हब’ उभं राहावं यासाठी त्यांनी रचनात्मक कार्य सुरू केले आहे. पुढे या क्षेत्रात माहिती-तंत्रज्ञान व्यवस्थापन, यासह उच्च शिक्षणाच्या संधी तरुणांना उपलब्ध होणार आहेत. या क्षेत्रातील युवतींनीही पुढे जावं यासाठी महिला शैक्षणिक विद्यापीठ करण्यासाठी काम सुरू केलं आहे. बदलत्या काळानुसार परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं यासाठी आ. किसन कथोरेच विद्यार्थ्यांशी नेहमी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करत असतात.         
 
                                                                                                                                       (संकलन - रविंद्र घोडविंदे)

 
@@AUTHORINFO_V1@@