महानायकाचा हा लूक पाहिलात का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |

 


 
 
मुंबई : बहुचर्चित सिनेमा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ चा टीझर प्रदर्शित झाला आहे. अमिताभ बच्चन यांचा या चित्रपटातील लूक यशराज फिल्म्सने प्रदर्शित केला आहे. अमिताभ हे या चित्रपटाद्वारे एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. 
 
 
 
 

डोक्यावर पगडी व हातात तलवार घेऊन जहाजावरील एका तोफेजवळ अमिताभ उभे असलेले दिसतात. खुदाबक्ष असे त्यांच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. एका योद्धाप्रमाणे अमिताभ या जहाजावर उभे आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासह या चित्रपटात आमिर खान, सना शेख, कतरिना कैफ हे कलाकार दिसतील. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली. येत्या दिवाळीत ८ नोव्हेंबर रोजी ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ हा चित्रपट प्रदर्शित होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@