त्रिपुरात ९६ टक्के जागांवर भाजप बिनविरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2018
Total Views |


 

 
आगरतळा : त्रिपुरात सत्तेत असलेल्या भाजपने त्रिस्तरीय पंचायतच्या पोटनिवडणुकीत ९६ टक्के जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जी. के. राव यांनी याबाबतची माहिती दिली. या राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या सुमारे तीन हजार सदस्यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त जागांसाठी येत्या ३० सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.
 
 
दरम्यान, विरोधी पक्षांनी भाजपच्या विजयावर आक्षेप घेतला आहे. ”विरोधी सदस्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते आणि त्यांच्या रिक्त जागांवर आमच्या उमेदवारांना अर्ज भरण्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखले होते. या रिक्त जागांवर एकही विरोधी उमेदवार अर्ज भरू न शकल्याने भाजपचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला,“ असा आरोप विरोधकांनी केला. ग्रामपंचायतच्या ३२०७, पंचायत समित्यांच्या १६१ आणि जिल्हा परिषदांच्या १८ अशा एकूण ३३८६ जागांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत पण, यातील ३२४७ जागांवर एकट्या भाजपचेच उमेदवार निवडणूक न लढताही विजयी झाले आहेत, हे विशेष.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@