पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६८वा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच दिवसाचे औचित्य साधून मराठमोळ्या पॅराजम्पर शितल महाजन यांनी पंतप्रधान मोदींना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. शिकागो येथे आज १३ हजार फुट उंचीवरून उडी घेऊन त्यांनी मोदींना शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी त्यांनी तिंरगी सूट परिधान करत हातात मोदींना शुभेच्छा देणारे पोस्टर हातात धरले होते.

 

 
 

शितल या गेल्या ४ वर्षांपासून मोदींची भेट घेण्‍याचा प्रयत्‍न करत होत्‍या. मात्र त्यांचे स्वप्न सत्यात उतरले नाही. यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्‍य साधून त्‍यांनी अनोख्‍या पद्धतीने लक्ष वेधून घेण्‍याचा प्रयत्‍न केला.

 
 
 
 
यावेळी शितल यांनी सुदीप कोडावती यांच्यासह यशस्वी उडी घेत मोदींना वाढदिवसच्या शुभेच्छा दिल्या. शीतल सध्या नॅशनल स्‍कायडायव्हिंग स्‍पर्धेत भाग घेण्‍यासाठी सध्‍या अमेरिकेत आहे. काही महिन्यांपूर्वीच शितल यांनी चक्क नऊवारी साडी नेसून स्कायडायव्हींग केली होती. तेव्हापासून त्या चांगल्याच प्रकाशझोतात असतात.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@