आ. राम कदम यांची महिला आयोगाकडे बिनशर्त माफी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |



मुंबई : वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी चोहीबाजूने टीकेचे धनी झालेले आमदार राम कदम यांनी महिला आयोगाची बिनशर्त माफी मागितली. भविष्यात महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी कार्यरत राहण्याची हमी देखील त्यांनी दिली. महिला आयोगाने आ. कदम यांच्याकडे या वादग्रस्त वक्तव्यावर कायदेशीर नोटीस पाठवून ८ दिवसात खुलासा मागितला होता. त्यावर कदम यांनी लेखी खुलासा करत आयोगाची माफी मागितली. दरम्यान, आ. कदम यांच्या खुलाशावर कायदेशीर सल्ला घेऊन योग्य ती कार्यवाही करु, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

 

आ. कदम यांनी या लेखी खुलाशात म्हटले आहे की, "मी यापूर्वीही महिलांची बिनशर्त माफी मागितली आहे. महिला आयोगाच्या माध्यमातून माता-भगिनींची बिनशर्त माफी मागत असताना आयोगाला एवढेच आश्वस्त करू इच्छितो की, आई-वडील हे साक्षात परमेश्वर आहेत. त्यामुळे प्रत्येक स्त्री साक्षात लक्ष्मी आहे, हा संदेश रुजविण्यासाठी मी प्रयत्न करीत राहीन," त्यामुळे आता आ. कदम यांच्या खुलाशावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@