मालमत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी भासतेय सीसीटीव्हीची गरजपोलिसांनाही होते तिसर्‍या डोळ्याची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 
मालमत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी भासतेय सीसीटीव्हीची गरज
पोलिसांनाही होते तिसर्‍या डोळ्याची मदत
 
जळगाव, १६ सप्टेंबर
हत्या, दरोडा, घरफोड्या तसेच रस्त्यावर घडणार्‍या प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची मदत होते. कुठलीही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होऊन आरोपी शोधण्यास मदत होते. परंतु जळगाव शहरातील बहुसंख्य बंगले, अपार्टमेंट, चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा अभाव असल्याने चोरांचे फावत असून अप्रिय घटना घडत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास पोलिसांनाही ते सोयीचे होऊन गुन्ह्यांचा तपास जलदगतीने लागून नागरिकांना दिलासा मिळेल. आज रोजी आपल्या घरावर, मालमत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे काळाची गरज आहे.
 
 
अनेक उच्चभू्र वस्तीत ठिकठिकाणी कॅमेर्‍यांचा अभाव किंवा कॅमेरे बंदावस्थेत असतात. चोरी किंवा दरोडा झाल्यास पोलीस आसपासच्या सीसीटीव्हींची मदत घेतात. परंतु सीसीटीव्ही बंद किंवा नसल्यास गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनाही ते जिकरीचे ठरते. सीसीटीव्हीमुळे खासगी सुरक्षारक्षकही नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसतात. सुरक्षा, प्रतिबंधात्मक उपाय, गुन्हेगारांवर धाक याबाबत सीसीटीव्ही परिणामकारक ठरत आहेत, यामुळे सीसीटीव्हीची आवश्यकता आहे.
तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत सीसीटीव्ही तंत्रज्ञान इतके विकसित झाले की, चित्रण टिपण्याचा परीघ कमी-जास्त करणे शक्य आहे. रात्रीच्या अंधारातील हालचाली स्पष्ट टिपता येतात. समोरच्या, शेजारी असलेल्या घरात सहज डोकावणे शक्य आहे. एका छोट्याशा नियंत्रण कक्षेत सर्व सीसीटीव्हींचे चित्रण स्क्रीनवर पाहता येते. यामुळे प्रत्येक कॉलनी परिसरात सीसीटीव्हींची गरज आहे.
तसेच परिवारातील सदस्यांची सूरक्षाही सीसीटीव्हीमुळे होत आहे. नोकरीवर गेल्यावर पाल्य काय करतात, हे बघणे सीसीटीव्हीमुळे शक्य झाले आहे. हे कॅमेरे पासवर्डच्या आधारे चित्रण दाखवतात. हे तपशील चुकून दुसर्‍याच्या हाती पडले, तर ती व्यक्तीही आपल्या घरातले चित्रण पाहू शकेल. त्यामुळे हा पासवर्ड, यूजर आयडी गोपनीय ठेवणे आवश्यक आहे.
 
 
३० लाखांचा बंगला मात्र सीसीटीव्ही नाही
सीसीटीव्ही हा तिसरा डोळा आहे. त्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवता येतो. एमआयडीसी परिसरात एकूण २०० कॅमेरे बसवण्यात आले असून २४ चौक यामुळे सुरक्षित झाले आहेत. जळगावात एकूण २५ ते ३० लाख बंगले आहेत, पण त्यात सीसीटीव्ही नाही. खासगी बंगले, अपार्टमेंट व्यावसायिकांनी सीसीटीव्हीची व्यवस्था केल्यास नागरिकांना सोयीचे होईल, यात शंका नाही. पण खासगी बांधकाम करणारे सीसीटीव्ही कॅमेर्‍यांना प्राधान्य देत नाही, हीच मोठी खंत आहे.
सुनील कुर्‍हाळे, पोलीस निरीक्षक, एलसीबी
२५ ते २७ हजारांपर्यंत खर्च
साधारणतः आठ सीसीटीव्ही कॅमेरा संचाला २५ ते २७ हजारांपर्यंत खर्च येतो. प्रत्येक कॅमेर्‍यामागे २ हजाराने वाढ होत असते. कॅमेर्‍याच्या स्टोरेज क्षमतेनुसार चित्रफीत संग्रहित होत असते. यामुळे तपास काम सोयीचे होते.
- पंकज चौधरी, सिनिअर सर्व्हिस इंजिनिअर.
व्हिडिओ क्लिपमुळे तपासाला दिशा
जिल्हा पेठेतील रहिवासी डॉ. नरेंद्र दोशी यांच्याकडे शनिवारी चोरी झाली होती. डॉ. दोशी यांच्याकडील गुन्ह्यात सीसीटीव्हीत कैद काही सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमुळे पोलिसांना तपासाला दिशा मिळण्यास मदत झाली. त्यामुळे पोलिसांना चोरटे पकडण्यात यश मिळाले. एका घटनेत शहरातील प्रसिद्ध डॉक्टराच्या घरातून काही लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरला होता. परंतु, सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्यामुळे तपासाचा वेग मंदावला. यामुळे सीसीटीव्ही काळीची गरज बनली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@