‘मसाका’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 
 
ना. गिरीश महाजन, आ. हरिभाऊ जावळे यांची शिष्टाई

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/


 
फैजपूर ता. यावल : येथील मधुकर सहकारी साखर कारखाना अनेक समस्या, संकटावर गेली ४२ वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. मात्र, ३ ते ४ वर्षांपासून साखर उत्पादित भाव आणि बाजारातील साखर भावात मोठी तफावत(घसरण) निर्माण झाल्याने या वर्षात कारखाना मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यासाठी मसकाला आर्थिक संकटांतून बोहर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.
 
 
कामगारांचे २५ महिन्यांपासून पगार थकल्याने कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. २३ सप्टेंबरला कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक सभा आहे तर सन २०१८-१९ चा गळीत हंगामाचा शुभारंभ तोंडावर येऊन ठेपला आहे. कारखाना क्षेत्रात ४ हजार ३०० हेक्टर ऊस उभा आहे. ऊस गाळप होणे शेतकरी व कामगारांचे हितासाठी आवश्यक आहे मात्र कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे पूर्व हंगामी कर्ज व इतर अत्यावश्यक देणी देण्यासाठी अंतरिम कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकेस तांत्रिक अडीचणी निर्माण झाल्याने कर्जपुरवठा लाभ मिळण्यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँक अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे व संचालक मंडळास मसाका प्रशासनाचे नेते माजी आ. शिरीष चौधरी, व कारखाना संचालक मंडळ यांच्यात बैठका घेतल्या. यातून मार्ग निघण्यासाठी सतत पाठपुरावा चालू आहे. राज्य सरकारकडून थकबाकी हमी मिळविण्यासाठी ना. गिरीश महाजन, माजी चेअरमन आ. हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, भागवत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, अशी गंभीर समस्या असणारे इतर कारखानेसुध्दा आहे. यासाठी सरकार या कारखाना समस्येतून मार्ग काढण्यासाठी व्यापक धोरण तयार करीत आहे. यामध्ये प्रामुख्याने मसाकाचा समावेश करण्यात येईल व कारखाना अडीचणीतून निश्चित मार्ग काढू असे अश्वासित केले आहे.या बरोबरच सहकारमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, यांचीही स्वतंत्र भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी आ. हरिभाऊ जावळे, ना. गिरीश महाजन, आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षा खडसे, साखर आयुक्त पुणे, प्रादेशिक संचालक औरंगाबाद, सचिव सहकार विभाग मुंबई यांच्याकडेसुद्धा कारखान्याच्या आर्थिक अडचणींबाबत निवेदन सादर करून चर्चा केली.
 
@@AUTHORINFO_V1@@