एसबीआयच्या सीएफओ पदी प्रशांत कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 
 
मुंबई : प्रशांत कुमार यांनी स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या (एसबीआय) मुख्य वित्तीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. या पूर्वी त्यांनी बँकेच्या मानव संसाधन विभाग आणि गुंतवणूक विभागात महत्त्वाच्या पदावर काम पाहिले आहे. दिल्ली विद्यापीठात विज्ञान शाखेतून पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतलेले कुमार १९८३ मध्ये बँकेत प्रमाणिकृत अधिकारी (पीओ) म्हणून रूजू झाले. त्यापासून त्यांच्या कार्यकाळाचा आलेख हा चढताच आहे.
 
 
मानव संसाधन विभागात उप व्यवस्थापकीय संचालक म्हणून एसबीआयच्या २ लाख ७० हजार कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण यंत्रणेची जबाबदारी त्यांच्यावर होती. कुमार यांनी यापूर्वी एचआर विभागासह, कोलकत्ता येथे सर व्यवस्थापक आणि मुंबई विभागाचे मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. कुमार यांच्या नियुक्तीनंतर शेअर बाजारात एसबीआयचा शेअर १.५९ टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी २८४.४५ रुपयांवर बंद झालेल्या शेअरच्या किमतीत ४.५५ रुपयांची वाढ झाली. सोमवारी शेअर २९० रुपयांवर बंद झाला. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयकडे २७.४७ लाख ठेवी आहेत. बँकेकडे सामान्य कर्ज आणि वाहन कर्जाचा अनुक्रमे ३२ टक्के आणि ३५ टक्के हिस्सा आहे. एसबीआयच्या सुमारे २२ हजार पाचशे शाखा आहेत. दिवसाला सुमारे २७ हजार नवे ग्राहक एसबीआयशी जोडत असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@