वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आ़़ज दि. १७ सप्टेंबर रोजी ६८ वा वाढदिवस आहे. पंतप्रधान त्यांचा वाढदिवस त्यांच्या मतदारसंघातून म्हणजे वाराणसी येथे साजरा करणार आहेत. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसह सोमवारी पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात शंकराच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर ते येथील विद्यार्थ्यांसह मुलांसोबत 'चलो जिते है' हा लघुपट पाहतील. हा लघुपट मोदींच्या आयुष्यावर आधारीत आहे. गेल्या वाढदिवसाला मोदींनी गांधीनगरला जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती.
 
 

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही मोदी अनेक नव्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. यामध्ये बाबतपूर-शिवपूर रस्त्याचे विस्तारीकरण, रींग रोडचा पहिला टप्पा यांच्यासह बनारस हिंदू विद्यापीठातील काही प्रकल्पांचा समावेश आहे. मोदी यांच्या वाराणसी भेटीच्या पार्श्वभूमीवर काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहरातील सुरक्षेचा आढावा घेतला.

 
 

असा असेल मोदींचा कार्यक्रम

 

- पंतप्रधान मोदी सोमवारी सायंकाळी पाच वाजता रोहनियाच्या नरउर गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.


- संध्याकाळी ७ वाजता डीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसमध्ये काशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

 


- १८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता वारासणीत जवळपास ५५७ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण तसेच भूमिपुजन करणार आहेत.
 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@