शरद कळसकरला न्यायालयीन कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. कळसकरला २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. सीबीआयच्या पथकाने त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले.

 
चौकशी पूर्ण झाल्याने न्यायालयाने शरद कळसकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आता २९ सप्टेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी सीबीआयने न्यायालयात युक्तिवादादरम्यान नवी माहिती दिली. दाभोलकर यांची हत्या दुचाकीस्वार शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी केली. अंदुरे आणि कळसकर यांना मदत करण्यासाठी दोघे जण आधीच येऊन घटनास्थळी थांबले होते, असा दावा सीबीआयने केला होता. वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी चार पिस्तुलांची विल्हेवाट लावली आहे. २३ जुलै रोजी २०१८ रोजी त्यांनी पिस्तुलांची मोडतोड केली. पिस्तुलाचे तुकडे मुंबईतील खाडी पुलावरून खाली टाकून देण्यात आले. कळवा, भाईंदर येथील खाडी पुलावरून पिस्तुलाचे तुकडे टाकून देण्यात आल्याचा संशय असल्याचे सीबीआयने व्यक्त केला होता.
 
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@