धुळेकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |

१२० कोटींच्या खर्चाला दिली मान्यता

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

धुळे, १६ सप्टेंबर
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबध्द असून विकासकामांची मालिका शहरात राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. अक्कलपाडा धरणावरील १२० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात येईल. यामुळे धुळेकरांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. धुळे शहराचा चेहरा- मोहरा बदलण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा लाभ क्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील मैदानावर आयोजित अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 
 
यावेळी रोहयो मंत्री रावल म्हणाले, अटल महाआरोग्य शिबिराचा क्षण धुळेकरांसाठी ऐतिहासिक असून तो सुवर्णाक्षरात नोंदविण्यासारखा आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांपर्यंत जगातील अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. महिला, गरीब रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून श्री. महाजन यांनी मोठे काम उभे केले आहे. गेल्या वर्षी नंदुरबार येथे आरोग्य शिबिराचा अनेक गरजुंना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
मुख्यमंत्र्याच्या संकल्पनेनुसार राज्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून आतापर्यंत पाच लाख रुग्णांवर मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याचे पद्यश्री डॉ. लहाने यांनी प्रास्ताविकात सांगितले. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते रुग्णांना प्रातिनिधीक स्वरुपात दातांच्या कवळीचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर नाईक यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
 
@@AUTHORINFO_V1@@