नगरसेवक बियाणी यांची ९० लाखांत फसवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2018
Total Views |
 

 बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

 माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
भुसावळ, १६ सप्टेंबर
शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व नगरसेवक मनोज बियाणी यांना शेतजमीन अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रे सादर करून ९० लाख रुपयांत फसवल्याची घटना घडली आहे.
 
 
याप्रकरणी अकोल्यातील उद्योगपती तथा आरोपी विवेक रामराव पारस्कर (रा.तोष्णिवा ले-आऊट, अकोला) व प्रॉपर्टी ब्रोकर उमेश कन्हैयालाल लाठी (साई सदन, रणपिसेनगर, अकोला) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे समजले.
 
 
संशय बळावला अन् फसवणूक झाली उघड
संशयित जमीन आपल्या नावावर करून देत नसल्याने आपला संशय बळावल्यानंतर २७ जुलै रोजी खडका तलाठी कार्यालयात जाऊन शेत गट क्रमांक १६८-१६९ यांचे उतारे मिळण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर सर्व्हे नंबर १ ते १३७ असल्याचा दाखला मिळाला व त्यावेळी शेतजमीन सर्व्हे क्रमांक १६८ ही अस्तित्वात नसताना ती अस्तित्वात असल्याचे दाखवून आपली आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपींनी बनावट सही, शिक्क्यांद्वारे शेतजमिनीच्या इसारा पावतीपोटी ९० लाखांची रक्कम हडपली.
 
 
...तर संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी
बियाणी यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपीने माझ्यावर सिव्हिल लाईन, अकोल्यात पाच गुन्हे दाखल आहेत. माझ्याकडे गुंड लोक येत आहेत. तुमच्या कुटुंबाला संपवू, अशी धमकीदेखील दिल्याचे बियाणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलीस माझे वाकडे करू शकत नाही, असेही आरोपींनी म्हटल्याचे नमूद आहे. तपास पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवीदास पवार करीत आहेत.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
 
@@AUTHORINFO_V1@@