विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

डॉ.भूषण मगर, डॉ.सागर गरुड यांचे स्वप्न साकार

पाचोरा, १५ सप्टेंबर
तुमचा विश्वास, आमची सेवा, तुमचे आरोग्य, आमचे ध्येय असा विश्वास पाचोरा शहरातील रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणारे पाचोर्‍यातील डॉ.भूषण मगर यांनी मागील १० वर्षांपासून पाचोराकरांच्या सेवेसाठी जीवाचे रान करून आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
रुग्णसेवा देत असताना सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम केले जाते. डॉ. मगर यांनीदेखील तेच केले. डॉ.भूषण मगर यांचे कार्य हे पूर्ण शहरातच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी अर्पण केले आहे. डॉक्टरकी पेशा करत असताना सामाजिक कामाबरोबरच डॉ.मगर यांनी पाचोरा नगरपालिकेचे नगरसेवकपदही भूषवले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले, अशीच समाजसेवा करत असताना येणार्‍या अडचणींवर मात करत त्यांनी शहरामध्ये विघ्नहर्ता व मंगलमूर्ती असे दोन हॉस्पिटल चालवले. एवढे सगळे कार्य करत असताना बर्‍याच रुग्णांना अत्याधुनिक यंत्रणा नसल्यामुळे ते सेवा देऊ शकत नव्हते व बर्‍याच रुग्णांना जळगाव येथे जावे लागत होते. त्यात काही मृत्यूही पावत असे, त्याअनुषंगाने डॉ. भूषण मगर यांनी ठाम निर्णय करत पाचोर्‍यातदेखील आपण भव्य दिव्य असे हॉस्पिटल उभारू शकतो, ते कसे आणि कुठे याची कल्पना डॉ. मगर यांच्या डोक्यात निश्चित असावी म्हणूनच आज पाचोरा सेंट्रल येथे मुंबईसारखे हॉस्पिटल डॉ. भूषणदादा मगर व डॉक्टर सागर गरुड यांनी अस्तित्वात आणले आहे.
 
 
कॅथ लॅब-अँजिओग्राफी ते मेंदू विकारतज्ज्ञ त्याचबरोबर अद्ययावत प्रसूतीगृहाची सोय व लवकरच येत्या ३ ते ४ महिन्यांच्या आत शासकीय सर्व योजनांचा लाभदेखील ह्या हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पाचोरा येथे विघ्नहर्ता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध करण्यात आले आहे. आपल्या वास्तूचे उद्घाटन प्रेरणादायी स्थान असलेल्या व्यक्तींकडून व्हावे, म्हणून भूषण मगर यांनी देशाचे माजी कृषिमंत्री व जाणते राजे मा. शरदचंद्र पवार यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन, आरोग्यमंत्री सावंत आणि जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारीही येथे उपस्थिती राहणार आहेत.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
@@AUTHORINFO_V1@@