गुरुवारी पडणार पुरुषोत्तम करंडकाचे लॉट्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

विचारांची देवाण-घेवाण, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे विषय होतील सादर

 
अडम तडम एकांकिकेची तालीम करताना महाविद्यालयीन विद्यार्थी. 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
जळगाव, १५ सप्टेंबर
जळगाव शहरात होणार्‍या पुरुषोत्तम करंडकासाठी विविध महाविद्यालयातील संघांचे लॉट्स गुरुवार, २० रोजी सकाळी साडेदहा वाजेदरम्यान मू.जे. महाविद्यालयात पडणार असून उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
यावेळी विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करायची असल्याचे समजले, त्या वेळोवेळी विद्यार्थ्यांना सांगितल्या जाणार आहेत.
 
 
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी अशा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असतात. विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण तसेच त्यांच्यात असणारी कला ही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना जागृत करण्याचे काम करत असते. आजचे युगच स्पर्धेचे असल्याने तरुणाई अशा स्पर्धांसाठी उत्सुक असतात. अशा स्पर्धा त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच पथदर्शी ठरतील, यात शंका नाही. यासाठी ‘तरुण भारत’ घेत असलेला हा आढावा...
एकांकिका - अडम तडम
एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय धुळे यांची अडम तडम ही एकांकिका विद्यार्थ्यांवर नेहमीच पालकांच्या अपेक्षांचे ओझे लादले जाते. यामुळे नकळत मुलांमध्ये पालकांबद्दल अनादर वाढून त्याचे पर्यावसान वेगवेगळ्या माध्यमातून पालकांसमोर येते. पालकांनी जर आपल्या पाल्याला समजून घेतले तर पाल्य नक्कीच आपले कार्य तडीस नेण्यासाठी प्रयत्न करेल, यावर या एकांकिकेत प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न महाविद्यालयीन विद्यार्थी करत आहे. याचे लिखाण हे राजेंद्र शिंदे यांनी केले असून विद्यार्थिनी राधिका चव्हाण हिने दिग्दर्शन केले आहे. रोज ५ तास याचा सराव होत असून प्रा. राहुल चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन संघाला मिळत असल्याचे पवन येवले याने सांगितले.
 
 
एकांकिका - ब्रेन
एम.जी.एस.एम. कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय चोपडा ब्रेन ही दोन आतंकीवर असलेली एकांकिका सादर करणार आहे. यात प्रामुख्याने कशाप्रकारे दहशतवादाला खतपाणी घातले जाते, यावर भाष्य केले जाणार आहे. या एकांकिकेत सत्याचा विजय तर होतोच तसेच दहशत माजवणारे कसे आपल्या देशावर प्रेम करायला लागतात, हेही दाखवण्यात आले आहे. एकूण दोन पात्रांभोवतीच फिरणार्‍या या एकांकिकेत वास्तवता दाखवली आहे. निलेश गोपनारायण यांनी एकांकिका लिहिली असून नितीन पाटील हा विद्यार्थी याचे दिग्दर्शन करत आहे. कुठलीही साधन सामग्री नसताना विद्यार्थी आपली कला सादर करत असून त्यांना प्राध्यापकांचेही सहकार्य लाभत आहे.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
@@AUTHORINFO_V1@@