गोव्यात तूर्त मुख्यमंत्री बदल नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

 
 
 
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेबाबबतच्या चर्चांना गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. विनय तेंडुलकर यांनी पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांना तातडीने दिल्लीतील एम्स् रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर गोव्यात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली होती. भाजपाचे राष्ट्रीय निरीक्षक पर्रीकरांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते.
 
 

निरीक्षक बी. एल. संतोष आणि विजय पुराणिक हे निरीक्षक पणजीत थांबले आहेत. राज्यातील भाजप नेत्यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी नेतृत्व बदलाचा सध्या तरी प्रश्न नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर झाली आहे. तेच सरकारचे नेतृत्व करतील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदाचा ताबा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर किंवा नगर नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे जाईल, अशी चर्चा होती, त्याचीही सध्या गरज नसल्याचे खा. तेंडुलकर यांनी सांगितले. त्यामुळे पर्रीकरच पुन्हा नेतृत्व स्वीकारतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@