तालुक्यातील २९ गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

आ.शिरीष चौधरी : १४ कोटी ४० लाखांचा निधी, सर्व गावांचा पाणीप्रश्न सुटणार 

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
जळगाव - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यांतर्गत अमळनेर तालुक्यातील २९ गावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी १४ कोटी ४० लाख एवढा भरघोस निधी मंजूर झाल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी दिली.
 
 
आ. चौधरी यांनी २०१८-१९ मध्ये मतदारसंघाचा आराखडा मंजूर करून घेतल्यानंतर वरील २९ गावांना पेयजल योजना मंजूर व्हावी, यासाठी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला व संबंधित गावांची पाण्याची समस्या निदर्शनास आणून दिली. त्याचेच फलित म्हणून ही मंजुरी मिळाली असून यामुळे वरील सर्व गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
विशेष म्हणजे या पाणीपुरवठा कामांना प्रशासकीय मान्यतादेखील प्राप्त झाली असून या मंजुरीअंतर्गत पाण्याच्या स्रोतापासून गावापर्यंत पाईपलाईन आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी साठवण करण्यासाठी पाण्याची टाकी उभारली जाणार असल्याचे आमदारांनी सांगितले.
 
 
दरम्यान प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा टप्पा २ मध्ये समावेश करावा, यासाठी आमदार चौधरी यांनी १७ जून २०१६ रोजी ना. बबनराव लोणीकर, मंत्री पाणीपुरवठा महाराष्ट्र राज्य यांच्याशी पत्र व्यवहार केला होता. यावर प्रधान सचिव (पाणीपुरवठा) यांनी अहवाल सादर करावा, असे आदेश मंत्र्यांनी दिले होते. यानंतर प्रस्ताव सादरीकरण करण्याचे काम सुरू होते. मात्र सदर कामात प्रगती न दिसल्याने आ. चौधरी यांनी पुन्हा १७ ऑक्टोबर २०१७ रोजी मंत्री लोणीकर यांना स्मरणपत्र दिले. यावर लोणीकर यांनी अतिरिक्त सचिवांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना टप्पा २ मध्ये हे काम समाविष्ट करावे, असे आदेश दिले. मात्र, या आदेशाबाबतही दिरंगाई होत असल्याने १४ मार्च २०१८ रोजी पुन्हा आ. चौधरी यांनी मंत्र्यांना स्मरणपत्र देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न क्र. ९२०६३ उपस्थित केला. यामुळे यावर तत्काळ कार्यवाही होऊन उपाययोजना करण्याबाबत हालचाली सुरू झाल्यात, शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेलाच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना असे नाव देण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार दिनांक २०१७/१८ व २०१८/१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यात अमळनेर मतदारसंघातील एकूण २९ गावांसाठी १४ कोटी ४० लाख एवढा मोठा निधी मंजूर झाला आहे.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
@@AUTHORINFO_V1@@