गिरीशभाऊ मानले तुम्हाला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

 जनमानस

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 जळगाव महापालिकेची स्थापना झाल्यापासून यावर्षी प्रथमच ५७ नगरसेवकांच्या माध्यमातून सत्ता भाजपाच्या ताब्यात आली आहे. शहरविकासाचे जनसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या भाजपाकडून महापौरपदी कुणाला संधी मिळते, याची निवडणूक निकालानंतर गेला सव्वा महिना असलेली उत्कंठा आज अखेर संपली असून, महापौरपदी सीमा भोळे व उपमहापौरपदी डॉ. अश्विन सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. आज या दोघांनी आपले अर्ज दाखल केले. ही नावे जाहीर करतानाच शहरविकास आणि सोशल इंजिनिअरिंगला भाजपा महत्त्व देत असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी दाखवून दिले.
महापालिकेत भाजपाला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर भाजपाचा पहिला महापौर म्हणून कुणाला संधी मिळते, याची चर्चा मागील सव्वा महिना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये होती. सीमा भोळे, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, भारती सोनवणे यांची नावे प्रामुख्याने स्पर्धेत होती. जळगावच्या राजकारणात लेवा पाटील, मराठा पाटील आणि कोळी समाजाचे वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौरपदी नगरसेवकांना संधी देताना समाजातील वेगवेगळ्या घटकात संतुलन (बॅलन्स) साधण्याचे आव्हान पक्षासमोर होते. तरुण भारतनेही यापूर्वीच्या वृत्तात बॅलन्स साधणारी व्यक्तीच महापौर होणार असल्याचे संकेत दिले होते. जळगावचे वैशिष्ट्य म्हणजे महापालिकेचे कार्यक्षेत्र आणि जळगाव शहर मतदारसंघ एकच आहे. महापालिकेतील या आधीच्या सत्ताधार्‍यांनी गेल्या ३० वर्षात जळगावच्या भल्यासाठी काहीच केले नसल्याची खदखद जळगावकरांमध्ये आहे. त्यामुळे शहरविकास या मुद्यावर जळगावकरांनी भाजपाला संधी दिली आहे. जनतेच्या अपेक्षांच्या कसोटीवर खरे उतरण्याचे सर्वात मोठे आव्हान भाजपासमोर आहे.
 
 
पक्षनिष्ठा, सोशल इंजिनिअरिंग आणि शहरविकास या मुद्यांवर कोणाला संधी द्यायची याचा बारीक विचार ना. महाजन यांनी केल्याचे दिसत आहे. महापौरपदी सीमा भोळे आणि उपमहापौरपदी डॉ. अश्विन सोनवणे यांना भाजपाने संधी दिल्याचा सकारात्मक संदेश लेवा पाटील आणि कोळी समाजात पोहोचण्यास मदत होणार आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला याचा निश्चितच फायदा होईल. याशिवाय स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. महापौरांएवढेच हेही पद तितकेच महत्त्वाचे आहे.
महापौरपदी सीमा भोळे यांना संधी मिळाली आहे. भाजपाकडे सर्वाधिक नगरसेवक (७५ पैकी ५७) असतानाही केवळ १५ नगरसेवक असलेल्या शिवसेनेने आपले उमेदवार मैदानात उतरविले आहेत. जादूची कांडी फिरविण्याची भाषा त्यांचे नेते करीत आहेत. जनतेने त्यांना जागा दाखवून दिली असतानाही ते समंजसपणा दाखवायला तयार नाहीत. त्यामुळे महापौरपदासाठी निवडणूक होणे अटळ आहे.
 
 
सर्वांनाच आश्चर्यचकित केले
उमेदवारांची नावे जाहीर करण्यात ना. महाजन यांनी आखलेल्या रणनीतीला तोड नाही. त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारांचे नाव अधिकृतरीत्या जाहीर केले. तोपर्यंत चर्चेतील उमेदवारांनाही आपली वर्णी लागेल, याची शाश्वती नव्हती. यामुळे घराणेशाहीसारखे फुटकळ मुद्दे वाळलेल्या पालापाचोळ्याप्रमाणे कुठच्या कुठे उडून गेले. महापालिका ताब्यात घेण्यापासून ते आजपर्यंत ना. गिरीश महाजन यांनी आखलेल्या रणनीतीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
 
 
आ. भोळे यांची जबाबदारी दुपटीने वाढणार
सीमा भोळे महापौर झाल्यानंतर त्यांचे पती आ. सुरेश भोळे यांची जबाबदारी दुपटीने वाढणार आहे. दोन पदांची प्रतिष्ठा त्यांना सांभाळावी लागेल. शहराच्या विकासाशी संबंधित अमृत योजना, पथदिवे, १२५ कोटी रुपयांचा विकास निधी इत्यादी योजना थेट मंत्रालयाशी संबंधित आहेत. त्यामुळे आ. भोळे यांना स्वतः जातीने या सर्वांमध्ये लक्ष घालावे लागेल. त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होईल. भाजपानेही एक वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन दिले आहे. त्या दृष्टिनेही थेट मुख्यमंत्री व मंत्रालयातील विविध विभागांशी संबंधित व्यक्ती पदावर असणे आवश्यक आहे. सीमा भोळे यांना १० महिने संधी मिळेल. तोपर्यंत विधानसभा निवडणुकाही होतील. आ. सुरेश भोळे व सीमा भोळे हे विशिष्ट प्रभाग डोळ्यासमोर न ठेवता शहराचा सर्वसमावेशक पद्धतीने विकास करतील, याचा विश्वास ना. महाजन यांना आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
@@AUTHORINFO_V1@@