संजय निरुपम यांना हटवा, काँग्रेस नेत्यांची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

 


 
 
मुंबई : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना अध्यक्ष पदावरून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष करावे. अशी ही मागणीही करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे ही मागणी केली असून सध्या काँग्रेसमध्ये संजय निरुपम यांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. काँग्रेस नेत्यांनी असा संजय निरुपम यांच्या विरोधात सूर लावल्याने मुंबईतील काँग्रेसचे अतंर्गत राजकारण पाहायला मिळत आहे. याप्रकरणी संजय निरुपम यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@