सहकार कार्यालयांना टाळे ठोकणार: जनसंग्रामचा इशारा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |
जळगाव, १५ सप्टेंबर
सहकार राज्यमंत्री व सहकार आयुक्त यांनी कालबद्ध कृती कार्यक्रम ठरवूनसुद्धा ठेवीदारांना ठेवी परत करण्यात सहकार विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे महिनाभरात ठेवीदारांना वसुलीच्या प्रमाणात चेक नाही दिले तर प्रत्येक तालुका कार्यालयाला टाळे ठोकून ठेवीदार जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/
  
सहकार विभागाचे नाशिक विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्या विशेष उपस्थितीत जळगाव येथे नुकतेच डीडीआर कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विवेक ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
 
मालमत्ता विक्री व ठेवीदारांनी लिलावात भाग घेण्याचा शासनाच्या निर्णयाचासुद्धा ठोस असा उपयोग झालेला नाही. प्रत्यक्षात ठेवी परत करण्याचे थेट प्रयोजन काय? असा सवाल करत रावेर, यावल, भुसावळ व जळगाव तालुक्यांच्या सहाय्यक निबंधकांनी कर्ज वसुलीतून ठेवीदारांना चेक वाटप करण्याचा कार्यक्रम लावावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
जिल्ह्यासाठी संस्थांच्या कर्ज वसुलीला गती मिळावी, म्हणून स्वतंत्र जिल्हा उपनिबंधक दर्जाचा अतिरिक्त अधिकारी व कार्यालय देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. संस्थाचालकांशी सहकार व ऑडीट विभागाच्या लोकांशी असलेले साटेलोटे यामुळे ईडीच्या कारवाईचे घोडे अडले असल्याचा आरोप करण्यात आला.
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... https://www.facebook.com/Tarunbharatjal/

 
@@AUTHORINFO_V1@@