भाजपवर कोणत्याही समाजाचा शिक्का नाही : अमित शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018
Total Views |

 


राजस्थान : भारतीय जनता पक्षावर कोणत्याही समाजाचा शिक्का बसलेला नाही. आमचा पक्ष हा एखाद्या समाजाचा पक्ष नसून पूर्ण समाजाचा पक्ष आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले. राजस्थानमधील पाली येथे मागासवर्गीय संमेलनात रविवारी ते बोलत होते. “भाजपाचे हे वैशिष्ट्य आहे की, पक्ष कोणत्याही एका जाती किंवा समाजाचा नाही. आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी भारतात विकासाचा मंत्र ‘सबका साथ सबका विकास’ सांगितला आहे.

 
विकासात सर्वांची भागीदारी असली पाहिजे. माळी, गुर्जर, जाट, इतर जाती, दलित आणि वनवासी या सर्व लोकांचा भाजप हा पक्ष आहे. यावेळी त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी मोदी सरकारने केलेल्या कार्यांची माहिती उपस्थितांना दिली. २०१४च्या निवडणुकीनंतर राजस्थानच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास टाकला. सर्व मतदारसंघात विजय मिळवून देऊन त्यांना पंतप्रधान बनवले. तेव्हापासून मोदींनी मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले असून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही, असे ते म्हणाले. मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम मोदी सरकारने केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या पूर्वीच्या काँग्रेस सरकारने मागासवर्गीय समाजाला न्याय दिला नाही. पण मोदी सरकार मागासवर्गीय समाजासाठी विविध कार्यक्रम करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
 
      
            माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@