'स्वच्छता हीच सेवा' मोहिमेची सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेची सुरुवात केली. गांधी जयंतीपर्यंत ही मोहीम सुरु राहणार असून स्वच्छतेचे महत्व घराघरामध्ये पोहचवणे हा यामागील उद्देश आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशातील जवळपास २ हजार लोकांना पत्र लिहून या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. यामध्ये देशातील विविध क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. यावेळी मोदी यांनी या मोहिमेत सामील होऊन महात्मा गांधी यांची स्वच्छ भारत ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे.

  

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की. "देशात ६०-७० वर्षात जे झालं नाही, ते गेल्या चार वर्षात आम्ही करून दाखवलं. आतापर्यंत ९ कोटी शौचालये बांधले गेले असून जवळपास ४.५ कोटी गाव हागणदारी मुक्त झाले आहेत. चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या स्वच्छता अभियानला देशातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून देशातील प्रत्येक नागरिक या अभियानात सहभागी होतोय याचा अभिमान आहे.

 
 
 
 

देशभरातून प्रतिसाद

पंतप्रधानांच्या या मोहिमेला अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, समाजातील अनेक प्रतिष्ठित व सर्वसामान्य व्यक्तींनी स्वच्छता मोहीम राबवून प्रतिसाद दिला. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद, जे. पी. नड्डा, राधामोहन सिंह, उमा भारती, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन यांच्यासह अनेकांनी विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@