अतुल्य भारतच्या लोगोमध्ये ‘गांधींची भूमी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018
Total Views |


 

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांची १५० वी जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाणार आहे. या निम्मिताने गांधींची भूमीया शब्दाचा अतुल्य भारतच्या लोगोमध्ये समावेश करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पर्यटन मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०१८ ते ३० मार्च २०१९ दरम्यान भारतासह संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार आहे. त्यामुळे सरकारने सर्व मंत्रालयाला याबाबत एक कार्यक्रम सूची तयार करायला सांगितले होते. याचाच भाग म्हणून गांधींची भूमीया शब्दाचा समावेश पर्यटन मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम असलेल्या अतुल्य भारतच्या लोगोमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.

 

वर्मा यांनी याबाबत म्हटले की, "महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रमांची आम्ही योजना आखली आहे. अतुल्य भारतच्या लोगोमध्ये लवकरच गांधींची भूमीया शब्दाचा समावेश करणार आहोत. तसेच हा लोगो पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@