दै.तरुण भारतचे भाकित खरे ठरले जळगावच्या महापौरपदी सीमा भोळे ; उपमहापौरपदी अश्विन सोनवणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018
Total Views |
 
 

दै.तरुण भारतचे भाकित खरे ठरले
जळगावच्या महापौरपदी  सीमा भोळे ; उपमहापौरपदी अश्विन सोनवणे
 

जळगाव,15 सप्टेंबर
जळगाव महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होवून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. महापौर ओ.बी.सी. महिला राखिव असल्याने अनेकांनी मोर्चे बांधणी केली परंतु तरुण भारतने वर्तविल्या प्रमाणे आ.सुरेश भोळे यांच्य पत्नी सीमा भोळे यांची वर्णी निश्चित झाली तर उपमहापौरपदी अश्विन सोनवणे यांची वर्णी लागणार आहे.
 
 
जळगाव महानगर पालिका निर्मिती झाली तेव्हापासून म.न.पा.वर माजी आ.सुरेश जैन यांचे एकहाती वर्चस्व होते. जैन यांचा बालेकिल्ला उध्दवस्त करुन भा.ज.पा.ने एकहाती सत्ता मिळविली. सुरेश जैन यांनी जळगाव शहरावर मजबुत पकड करण्यासाठी सोशल इंजिनचा वापर केला होता. यात 6 महिन्यांसाठी विविध समाजाला प्रातिनिधीक महापौरपद देण्यात आले. हाच पायंडा भाजपाने स्विकारला असल्याने सीमा भोळे यांची महापौरपदी आणि अश्विन सोनवणे यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. महापौर ही जबाबदारी 10 महिन्यांसाठी असणार आहे. त्यामुळे 5 वर्षात सहा महापौर मनपाच्या कारभारात असू  शकतात.
 
 
आ.सुरेश भोळे यांनी माजी आ.सुरेश जैन यांना विधानसभेच्या निवडणुकित शह दिला होता. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी मोठया प्रमाणात निधीसुध्दा उपलब्ध केला होता. परंतु निधी कसा व कुठे वापरायचा या संघर्षात निधी अडकून राहिला होता. मनपा निवडणुकित भाजपाला बहुमत मिळावे यासाठी आ.भोळे यांनी शहरातील प्रत्येक भाग पिंजून काढला होता. राज्यात भा.ज.पा.ची सत्ता असल्याने तसेच ना.गिरीश महाजन यांनी वर्षभरात शहराचा कायापालट करण्याचा शब्द दिला आहे. वर्षभरात कामे केली नाहीत तर सुरेश भोळे यांच्यासाठी मते मागायला येणार नाही अशी घोषणाच ना.महाजन यांनी जाहिरासभांमधून केली होती. त्या अुनषंगाने शहरातील विकास कामे गतीने होण्यासाठी भोळे दाम्पंत्याचा प्रयत्न असु शकणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@