जळगावच्या महापौरपदी भाजपाच्या सीमा भोळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018
Total Views |


 

जळगाव : जळगाव महानगर पालिकेमध्ये इतिहास घडला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. आ. सुरेश भोळे यांच्य पत्नी सीमा भोळे यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी अश्विन सोनवणे यांची निवड झाली. याबाबत 'जळगाव तरुण भारत'ने केलेले भाकीत खरे ठरले आहे. महापालिकेची निर्मिती झाल्यापासून आ.सुरेश जैन यांचे एकहाती वर्चस्व होते. जैन यांना धोबीपछाड करत भाजपाने मिळवलेला विजय विशेष ठरला आहे.

 

मनपा निवडणुकित भाजपाला बहुमत मिळावे यासाठी आ. भोळे यांनी शहरातील प्रत्येक भाग पिंजून काढला होता. त्याचबरोबर ना. गिरीश महाजन हे देखील येथे तळ ठोकून होते. राज्यात भाजपाची सत्ता असल्याने तसेच वर्षभरात शहराचा कायापालट करण्याचा ना. महाजन यांनी शब्द जळगाव वासियांना दिला होता. जळगाववासीयांनी देखील महाजन यांच्या शब्दाला साथ देत महापौरपदी सीमा भोळे यांना संधी दिली. महापौर सीमा भोळे यांचा कार्यकाळ १० महिन्यांसाठी असणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@