माझा स्वभाव कडक आहे - माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018
Total Views |
 
 
माझा स्वभाव कडक आहे - माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे
रावेर , १५ सप्टेबर 
रावेर  : विरोधी पक्षनेता होते तेव्हा तात्काळ काम होत होती आता दोन वर्षा पासून बुरहानपुर-अंकलेश्वर राष्ट्रिय महामार्गवर प्रचंड खड्डे पडले आहे. जनतेचे प्रश्न मी प्रखडपणे मांडतो व ते सोडवीण्यासाठी भांडतो..माझा  स्वभाव कडक   असल्याने  नकोसा झालो आहे  असा टोला माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे  वाघोड येथे लगावला .  वाघोड येथे गण व बूथ प्रमुखांचा कार्यकर्ता मेळावा अयोजित केला होता यानिमित्ताने माजी मंत्री खडसे वाघोड (ता रावेर) येथे कार्यक्रमाला आले होते .
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा राष्ट्रीयध्यक्ष अमित शहा व केंद्र सरकाच्या योजनांचे व कामांचे तोंडभरून कौतुक करून जनतेने लाभ घेण्याचे अवाहन केले.  याप्रसंगी मंचावर  खासदार रक्षा खडसे , आ.हरिभाऊ जावळे , माजी खा .गुणवंत सरोदे,  जि.  प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन ,जि. प. सदस्य कैलास सरोदे, सौ. रंजना पाटील प स सदस्य जुम्मा तडवी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील , सरपंच शारदाताई पाटील प.स.सदस्या योगिता वानखेडे सरपंच श्रीकांत महाजन,माजी प स सदस्य महेश पाटील गोपाळ नेमाडे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ .सुनील नेवे , शिवाजीराव पाटील , सरचिटणीस विलास चौधरी, महेश चौधरी , सुनील पाटील,  दुर्गादास पाटील,सुरेश पाटील प्रल्हाद पाटील आदी भाजपा कार्यकर्ते लोकप्रतिनिधी उपस्थिती होते.
 
पाल-के-हाळा गटाचा मेळावा रमजीपुर मध्ये मेळावा
जि. प . पाल-के-हाळा गटाचा मेळावा रमजीपुर (ता. रावेर ) येथे संपन्न झाला यावेळी खा रक्षा खडसे यांनी आगामी निवडनुकीसाठी कार्यकर्ते, पदाधिकारी,यांनी सज्ज राहण्याचे अवाहन केले शासनाच्या योजना जनते पर्यंत पोहचविण्याच्या  सूचना उपस्थितांना दिल्या. यावेळी  भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ,जि. प. सदस्य नंदा अमोल पाटील , माजी शिक्षन सभापती सुरेश धनके , पं .स. सदस्य  पी. के.महाजन, धनश्री सावळे,प्रमोद धनके आदी भाजपा कार्यकर्ते  या मेळाव्याला उपस्थिती होते.
 
@@AUTHORINFO_V1@@