पाचोरा येथे मांडूळासह एक जण ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018
Total Views |
 
 
पाचोरा येथे मांडूळासह एक जण ताब्यात
 
पाचोरा, 15 सप्टेंबर
पोचारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पो.कॉ. अमृत पाटील यांना खडकदेवळा ता. पाचोरा शिवारात मांडुळ सापाची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना दिली. त्यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीसांनी कारवाई केली. यात एक इसम व मांडूळासह मिळून आला आहे.
 
पो.उ.नि. दत्तात्रय नलावडे, पो.कॉ. अमृत पाटील, किरण पाटील, प्रशांत चौधरी यांनी सापळा रचून चिंचखेडा गावाचे पुढे दुचाकी क्र. एमएच 19 बीएस 0954 हीचा पाठलाग करुन सारोळा गावाच्या अलीकडे सुमारे अर्धा कि.मी.अंतरावर त्यांना पकडले. दुचाकिवरील एक इसम पळून जाण्यात यशस्वी झाला तर दुस-यास पोलीसांनी पकडले त्याची चौकशी पोलीसांनी केली असता त्याचे नाव अजय साहेबराव पाटील वय 30 रा.खडकदेवळा ता.पाचोरा असे सांगितले. त्याच्या बॅगची झडती घेतली असता काळसर रंगाचा दुर्मिळ दुतोंडी मांडुळ साप , भुरकट तांबडया रंगाची माती जप्त करण्यात आली. पळून गेलेल्या इसमाची माहिती पोलीसांनी घेतली असता मनोज ज्ञानेश्वर गावंडे रा. कु-हाकाकोडा ता. मुक्ताईनगर असे असल्याचे त्याने सांगीतले.
तसेच दुस-या दुचाकीवर आलेल्या इसमांबाबत विचारपूस केली असता ते सुध्दा दुतोंडी मांडूळ साप विकण्यास आले होते . परंतु त्यांचे नांव गावं माहित नाही असे अजय पाटील याने सांगीतले. मांडूळ व दुचाकी क्र. एमएच 19 बीएस 0954 ही ताब्यात घेवुन पंचनामा करुन मांडूळ व अजय पाटील यास वन विभागाकडे देण्यात आले आहे. पाचोरा वनविभागात अजय पाटील याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आरएफओ देसाई करत आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@