पाच दहशतवाद्यांना कंठस्‍नान; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2018
Total Views |


 

श्रीनगर : जम्‍मू काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले आहे. याठिकाणी अजून काही दहशदवादी लपल्याची शक्यता असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून येथील बारामुल्ला व काजीगुंड एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या ४८ तासात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत एकूण १३ दहशदवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.


या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दहशदवादी लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल मुजाहिद्दीन या संघटनेचे होते. २ बँक कर्मचारी आणि पोलिसांच्या हत्येमागे यातील बऱ्याच जणांचा समावेश होता. तसेच शस्रास्र व बँक लुटीच्या घटनांमध्ये यांचा सहभाग होता. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्रास्र जप्त केली असून पोलिसांची शोध मोहीम चालू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@