इस्त्रो गुप्तचर प्रकरणी शास्त्रज्ञाला नुकसानभरपाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2018
Total Views |

 

 
 
 
 
नवी दिल्ली : इस्त्रो गुप्तचर प्रकरणी शास्त्रज्ञ नांबीनारायण यांना विनाकारण अटक करण्यात आली असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून आज सांगण्यात आले. तसेच शास्त्रज्ञ नांबीनारायण यांना झालेला छळ आणि मानसिक त्रासाबद्दल ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
 
 

काय आहे इस्त्रो गुप्तचर प्रकरण ?

 

दोन परदेशी महिला आणि दोन भारतीय शास्त्रज्ञ यांवर हेरगिरीचा आरोप करण्यात आला होता. नंतर मात्र हे प्रकरण खोटे असल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी काही जणांना काही वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यामध्ये शास्त्रज्ञ नांबीनारायण यांचाही समावेश होता. परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यानंतर नांबीनारायण यांना सोडण्यात आले, परंतु अटक झाल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला होता. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून त्यांना १ लाख रुपये देण्यात येणार होते. परंतु प्रकरणाचे गांभीर्य व शास्त्रज्ञ नांबीनारायण यांना झालेला त्रास लक्षात घेऊन सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने त्यांना ही नुकसानभरपाईची रक्कम वाढवून दिली. तसेच त्यांना विनाकारण अटक केले असल्याचे स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@